शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने?

By संजय पाठक | Updated: December 4, 2025 15:24 IST

...प्रस्तावित साधुग्रामच्या आरक्षणातून जागा सोडवून घेण्यासाठी मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची त्यावेळी चर्चा होती. ही जागा महापालिकेच्या ताब्यात राहिली असती तर आता महापालिका  साधुग्रामसाठी झाडे तोडावी लागली नसती. 

संजय पाठक -नाशिक : कुंभमेळ्यात येेणाऱ्या साधूंसाठी सुमारे ५२७ एकर जागा आरक्षित ठेवण्यासाठी प्रस्ताव होता. २००२-०३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यानंतर या संदर्भात महापालिकेने एक समिती स्थापन केली हाेती. मात्र, नंतर प्रस्तावित क्षेत्र कमी होऊन ते ३७७ वर आले आहे. दरम्यान, प्रस्तावातील दीडशे एकर क्षेत्र गायब झाले आहे. ते कोणाच्या आशीर्वादाने गायब झाले असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे क्षेत्र आज महापालिकेच्या ताब्यात राहिले असते तर वृक्षतोड करण्याची गरज भासली नसती. तसे न झाल्यानेच महापालिका अडचणीत सापडली आहे.यंदा अशीच तयारी झाली; परंतु १८०० वृक्ष तोडण्याच्या प्रस्तावामुळे हे प्रकरण महापालिकेच्या आणि राज्य शासनाच्या अंगाशी आले आहे. साधुग्रामच्या नावाखाली वृक्षतोड करू नये, त्याऐवजी एवढ्या क्षेत्रातील साधुग्राम अन्यत्र उभारावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे; तर साधुग्रामसाठी पुरेशी जागा नाही, असे प्रशासन सांगत असले मुळात यापूर्वीच्या म्हणजेच २००२-०३ कुंभमेळ्यानंतर सुमारे १५० एकर जागा कुठे गेली, असा प्रश्न निर्माण होत आहे. नाशिक महापालिकेने २००३-०४ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यानंतर त्यावेळीही जागेची अशीच अडचण आली; त्यामुळे भविष्यात जागेची अडचण होऊ नये यासाठी मोकळी जागा ताब्यात घेण्याचे ठरले होते. त्यावेळी बहुतांश जागा मोकळीच होती. तत्कालीन भाजपचे महापौर बाळासाहेब सानप यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आणि क्षेत्र सर्वेक्षण करून अंतिम जागानिश्चितीचे काम करण्यात आले. परंतु सुमारे ५२७ एकर क्षेत्रातील अनेक क्षेत्र नंतर कमी झाले, असे जुने नगरसेवक सांगतात. या ठिकाणी महापालिकेनेच इमारत बांधकामांना परवानग्या दिल्याने साधुग्रामसाठी जागा कमी झाली, असा मुद्दा त्यावेळच्या नगरसेवकांनी महासभेत गाजविला होता. प्रस्तावित साधुग्रामच्या आरक्षणातून जागा सोडवून घेण्यासाठी मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची त्यावेळी चर्चा होती. ही जागा महापालिकेच्या ताब्यात राहिली असती तर आता महापालिका  साधुग्रामसाठी झाडे तोडावी लागली नसती. 

सध्याची स्थिती -३७७ एकर साधुग्रामसाठी आरक्षित ९४ एकर महापालिकेच्या ताब्यात२८३ एकर उर्वरित क्षेत्र ताब्यात घेणे बाकी

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik: Where did 150 acres for Sadhugram disappear to?

Web Summary : 150 acres of land reserved for Sadhugram in Nashik went missing after the 2002-03 Kumbh Mela. A committee was formed, but the land vanished, raising questions about potential corruption and the need to cut trees now due to the shortage.
टॅग्स :NashikनाशिकKumbh Melaकुंभ मेळाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका