शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव आश्रमशाळेत ‘यमराज’ अवतरतात तेव्हा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 18:26 IST

सकाळी दहा-साडेदहाची वेळ! तळेगाव, ता. इगतपुरी येथील संजीवनी आश्रमशाळेत नेहमीप्रमाणे शाळा भरण्याची तयारी सुरू होती. तोच प्रवेशद्वारावर एक गाडी आली, जिच्यावर चक्क ‘यमराज’ स्वार झालेले होते! सावकाश गाडी पार्किंगमध्ये लावून अगदी चालत चालत ‘यमराज’ शाळेच्या कार्यालयात विराजमान झाले. चिमुकल्या विद्यार्थ्यांची तर भलतीच त्रेधातिरपीट उडाली.

ठळक मुद्देवाहतूक नियमांची जनजागृती : वाहन सुरक्षित चालविण्याचे आवाहन

घोटी : सकाळी दहा-साडेदहाची वेळ! तळेगाव, ता. इगतपुरी येथील संजीवनी आश्रमशाळेत नेहमीप्रमाणे शाळा भरण्याची तयारी सुरू होती. तोच प्रवेशद्वारावर एक गाडी आली, जिच्यावर चक्क ‘यमराज’ स्वार झालेले होते! सावकाश गाडी पार्किंगमध्ये लावून अगदी चालत चालत ‘यमराज’ शाळेच्या कार्यालयात विराजमान झाले. चिमुकल्या विद्यार्थ्यांची तर भलतीच त्रेधातिरपीट उडाली. मुलांची त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी उडाली.यमराज? आणि तेही शाळेत? गोंधळलात ना? साहजिकच आहे. शाळेत आलेले हे यमराज खरेखुरे यमराज नव्हते हो! ते होते सेवानिवृत्त अभियंता मिलिंद पगारे. प्लॅस्टिक प्रदूषणाची भीषण समस्या आणि त्यावर उपाय यावर त्यांनी अभ्यास केला आहे. या विषयावर ते कृतियुक्त व्याख्यानेही देतात.संजीवनी आश्रमशाळेत ते ‘यमराज’ बनून आले होते ते ट्रॅफिक नियमांचं पालन करा हे सांगण्यासाठी! त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर लोकांना हल्ली कसलीच भीती वाटेनाशी झालीय, अगदी यमाचीसुद्धा! लोकांनी यम पाहिलेला नसतो, पण तुमच्या बेदरकार वाहने चालविण्यामुळे तो कधीही तुमची भेट घेऊ शकतो, निदान त्याला घाबरून तरी रस्त्यावर रहदारीचे नियम पाळा आणि सुरक्षित वाहन चालवा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते नि:स्वार्थ भावनेने शाळेला भेटी देत जनजागृती करत आहे. सेवानिवृत्त माणसे म्हटले की निवांतपणाकडे सगळ्यांचा कल असतो; पण मिलिंद पगारे यांनी मात्र पर्यावरण जनजागृती, प्लॅस्टिक प्रदूषण, रहदारीचे नियम या सगळ्या गोष्टींमध्ये स्वत:ला अगदी वाहून घेत निवृत्तीनंतरची ‘सेकंड इनिंग’ सुरू केली आहे.विद्यार्थ्यांना धडेरस्त्यावर, महामार्गावर, शाळा-कॉलेज या ठिकाणी जाऊन जमेल तशी जनजागृती ते करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संजीवनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रहदारीचे नियम समजावेत, वाहन चालवताना काय खबरदारी घ्यावी यासाठी आपण काय काय करू शकतो, याची त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. लोकांना फरक पडेल न पडेल याचा विचार न करता ते अविरतपणे आणि मुख्य म्हणजे नि:स्वार्थीपणे जनजागृती करत फिरत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळाroad safetyरस्ते सुरक्षा