शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

झोपडपट्टीमुक्त शहर होणार तरी कधी? भीमवाडीतील आगीमुळे प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 10:14 PM

आर्थिक विषमता आणि झोपडपटयांमध्ये व्होट बॅँक आहे.तो पर्यंत तरी त्या संपतील असे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे अनेक योजना राबवून सुध्दा केवळ झोपडपट्टी मुक्त नाशिक शहर अशा घोषणा झाल्या परंतु निधी साफ झाला आणि झोपडपट्टी वासिय जैसे थे अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देपुनवर्सनाच्या योजना कागदावरचझोपडपट्यांची अवस्था जैसे थे

संजय पाठक, नाशिक : शहरातील भीमवाडीत लागलेल्या आगीत तब्बल १२० झोपड्या जळून खाक झाल्या आणि साडे सहाशे नागरीक बेघर झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात येथे झोपड्या आहेत, हे कोणालाही सहज लक्षात येऊ नये अशी ही वसाहत. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसली तरी यातून पुन्हा एकदा शहर झोेपडपट्टी मुक्त होणार कधी हा मुलभूत प्रश्न निर्माण होतो.योजना आल्या आणि गेल्या परंतु झोपडपट्या कमी झाल्या नाहीत की त्यात राहणाऱ्यांच्या अपेष्टाही संपल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो.  झपाट्याने विकसित होेत असलेल्या नाशिक नगरीत जशा इमारतीची दिवसागणिक उभ्या राहात आहे, त्याच पध्दतीने झोपडपट्या देखील वाढत आहेत.  स्थलांतरीत मजुर, कष्टकरी आणि गरीब यांची घरे हा सामाजिक प्रश्न पडपट्या झाल्या की त्या हटत नाही. त्यामुळे त्या होऊ नये असे केवळ कागदोपत्री धोरण असून उपयोग नाही. जोपर्यंत आर्थिक विषमता आणि झोपडपटयांमध्ये व्होट बॅँक आहे.तो पर्यंत तरी त्या संपतील असे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे अनेक योजना राबवून सुध्दा केवळ झोपडपट्टी मुक्त नाशिक शहर अशा घोषणा झाल्या परंतु निधी साफ झाला आणि झोपडपट्टी वासिय जैसे थे अशी स्थिती आहे.   शहरातील झोपडपट्टीवासियांसाठी यापूर्वी वाल्मिकी- आंबेडकर निवास योजना आखली. अनेक वसाहतीत घरे उभी राहीली. परंतु सर्वच जण लाभार्थी होऊ न शकल्याने झोपड्या कमी झाल्या नाहीत. केंद्रात पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सरकार असताना शहरी भागातील गरीबांसाठी घरकुल योजना राबविण्यात आली. त्यावेळी देखील झोपडपट्टीत सुमारे चार लाख लोक राहात असले तर सोळा हजार घरे बांधण्याचे नियोजन करणयत आले. प्रत्यक्षात त्यात घसरण झाली.मग बारा हजार, नऊ हजार आणि अखेरीस साडे सात हजार जेमतेम घरे बांधली गेली. त्यातील अनेक योजना अजुनही अर्धवटच आहेत. त्यामुळे कोट्यवधी रूपये पाण्यात गेले परंतु उपयोग झाला नाही.  शासकिय किंवा निमशासकिय यंत्रणेच्या मालकीच्या जागेवर ज्या झोेपड्या आहेत, त्यांच्यासाठी यापूर्वी योजना राबविण्यात आल्या आहेत आता खासगी भूखंडावरील झोपडपट्टीवासियांसाठी मुंबई- ठाण्याच्या धर्तींवर एसआरए म्हणजेच झोपु (झोपडपट्टी पुनर्वसन) योजना राबविण्याचे २०१७ मध्ये ठरले आहे. मात्र तीन वर्षे झाली तरी या योजनेच्या प्राथमिक कामकाजाला मुहूर्त लाभलेला नाही. मागणी करणारे आणि श्रेय घेणारे सारेच शांत बसून आहेत. झोपडपट्टीत एखादी दुर्घटना घडली की अशा मागण्या उचल घेतात. नंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे! त्यामुळे झोपडपट्टी मुक्त शहर कसे होणार हा प्रश्नच आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfireआग