-------------
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
* पंचवटी एक्स्प्रेस
* राज्यराणी एक्स्प्रेस
* जनशताब्दी एक्स्प्रेस
* मंगला एक्स्प्रेस
* तपोवन एक्स्प्रेस
* जनशताब्दी एक्स्प्रेस
* सेवाग्राम एक्स्प्रेस
---------------
मुंबईला सवलत, आम्हाला का नाही?
कोरोनाच्या नावाखाली रेल्वे प्रशासनाने ज्याप्रमाणे पॅसेंजर गाड्या बंद करून ठेवल्या आहेत, त्याप्रमाणे सर्वसाधारण तिकीटदेखील बंद केले आहे. ज्या प्रवासाचे कन्फर्म आरक्षण तिकीट असेल त्यालाच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने मासिक पास सेवा बंद केली, मात्र मुंबईच्या ज्या प्रवाशांचे लसचे दोन डोस झाले आहेत त्यांना प्रवासासाठी मासिक पासची सुविधा देण्यात येत आहे. मात्र मुंबई वगळता इतर प्रवाशांना तशी सुविधा रेल्वे प्रशासन न देता त्यांची लूट करीत आहे.
-------
भुर्दंड किती दिवस सहन करायचा?
कोरोनाच्या नावाखाली केंद्र व रेल्वे प्रशासन सर्वसामान्य गोरगरीब प्रवाशांचा विचार न करता आर्थिक लूट करत आहे. कन्फर्म आरक्षण तिकीट, सर्वसाधारण तिकीट बंद असे विविध नियम लावून रेल्वे प्रशासनाची मनमानी चालू आहे.
- राजेश फोकणे
---------
शिक्षण, व्यवसाय, नोकरी व इतर कामासाठी रेल्वेने दररोज अप-डाउन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गरज लक्षात घेणे गरजेचे आहे; परंतु रेल्वे प्रशासन हे पूर्णपणे व्यावसायिक वागत असल्याने त्यांना प्रवाशांच्या अडीअडचणी यांच्याशी काही देणेघेणे राहिलेले नाही.
-किरण बोरसे
----------
सर्वसामान्य व गोरगरीब हे जास्त करून रेल्वेने प्रवास करतात. दररोज अप-डाउन करणाऱ्या प्रवाशांना वेळेची व पैशाची बचत होत असल्याने तसेच अपघाताची कुठलीच शक्यता नसल्याने रेल्वेमार्फत प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
- संजय शिंदे
-------------
मासिक पास सुरू करणे, सर्वसाधारण तिकीट सुरू करणे, कन्फर्म आरक्षण तिकीट पाहिजे असे सर्व नियम हे रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करून सर्वत्र त्याची अंमलबजावणी केली जाते. आम्हाला जे आदेश व सूचना प्राप्त होतात त्यानुसारच आम्ही काम करतो.
-आर.के. कुठार
प्रबंधक, रेल्वेस्थानक, नाशिकरोड