नाशिक : राज्य सरकारने पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिवाळीपूर्वीपासूनच पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र नाशिक महालिका क्षेत्रात अद्याप यासंदपर्भात कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नसल्याने खासगी प्राथमिक महासंघाचे पदाधिकाऱ्यांनी मनपा शिक्षणाऱ्यांसोबत बैठक घेत मनपा क्षेत्रातील पाचवीचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याची प्रक्रिया केव्हा सुरू होणार याविषयी विचारणा केली. तसेच प्रत्यक्ष शाळा सुरू होण्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहनही संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले.
राज्य शासनाने १६ सप्टेंबरला जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील माध्यमिकचा पाचवीचा वर्ग नवीन शैक्षणिक धोरणानुसार चौथीपर्यंतच्या शाळांना जोडण्याचे आदेश देण्यात आले होते. याविषयी जिल्ह्यात माहिती संकलन करून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. परंतु, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील शाळांबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत मनपा शिक्षणाधिकाऱ्यांना खासगी प्राथमिक महासंघाने विचारणा करतानाच यासंदर्भात तत्काळ माहिती एकत्रित करून व प्राथमिक-माध्यमिक विभागावर काय परिणाम होतो याचा आढावा घेण्याचे आवाहनही या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यावेळी महासंघाचे अध्यक्ष नंदलाल धांडे ,सचिव सुनील बिरारी, रूपेश सोनवणे, दादाजी अहिरे आदी उपस्थित होते.
( आरफोटो- ०३ सीटी स्कूल)