शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

...जेव्हा बुलेटच्या सीटखाली सापडतात तलवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 01:04 IST

शहरात मागील काही दिवसांपासून विनापरवाना शस्त्र बाळगून दहशत माजविण्याचे प्रमाण वाढत असल्याने उपनगर, टाकळीरोड, टाकळी गाव भागात रात्रीच्या गस्तीवर असलेल्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका संशयास्पद बुलेटस्वाराला रोखून झडती घेतली असता त्या बुलेटच्या सीटखाली धारधार दोन तलवारी पोलिसांना आढळून आल्या.

ठळक मुद्देठोकल्या बेड्या : मध्यवर्ती गुन्हे शाखेचा सापळा यशस्वी

नाशिक : शहरात मागील काही दिवसांपासून विनापरवाना शस्त्र बाळगून दहशत माजविण्याचे प्रमाण वाढत असल्याने उपनगर, टाकळीरोड, टाकळी गाव भागात रात्रीच्या गस्तीवर असलेल्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका संशयास्पद बुलेटस्वाराला रोखून झडती घेतली असता त्या बुलेटच्या सीटखाली धारधार दोन तलवारी पोलिसांना आढळून आल्या. पोलिसांनी याप्रकरणी सिद्धेश मनोज जोंधळे (२७, रा. रामदास स्वामीनगर, टाकळीरोड) यास बेड्या ठोकल्या.

शहरात शस्त्रांचा धाक दाखवून लुटमारीचे वाढते प्रकार रोखण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशानुसार उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी सर्वच गुन्हे शाखांना विनापरवाना शस्त्रे घेऊन मिरविणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकण्यासाठी मोहीम हाती घेण्याची सूचना केली आहे. यानुसार गुन्हे शाखा युनिट-१, युनिट-२ आणि मध्यवर्ती गुन्हे शाखांचे गस्तीपथके सक्रिय झाली आहेत. दोन दिवसांपूर्वीच शिवाजीनगर भागात अशाच एका दुचाकीस्वाराकडून धारधार शस्त्रे युनिट-१च्या पथकाने जप्त केली होती. मध्यवर्ती गुन्हे शाखेतील हवालदार गंगाधर केदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सहायक निरीक्षक कुंदन सोनोने, धर्मराज बांगर यांच्या पथकाने टाकळीरोड येथे सापळा रचला. यावेळी संशयास्पद बुलेट (एमएच १५ एफझेड २३२८) आली असता पोलिसांनी ती अडविली. या बुलेटची तपासणी केली असता पोलिसांना मागील बाजूस सीटच्या उजव्या बाजूने एका बॅनरमध्ये दोन धारधार तलवारी गुंडाळून बांधण्यात आल्याचे आढळले. पोलिसांनी सिद्धेशविरुद्ध पोलीस आयुक्तालय हद्दीत विनापरवाना शस्त्र बाळगणे आदेशाचे उल्लंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी