शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच आयटीआयला सहसंचालकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:36 IST

सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सहा वर्षांपासून पूर्णवेळ प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य नसल्याने शासनाने संस्था वाऱ्यावर सोडली की काय याबाबतचे वृत्त सोमवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक एस. आर. सूर्यवंशी यांनी आयटीआयला भेट देत सद्यस्थिती जाणून घेतली.

सातपूर : सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सहा वर्षांपासून पूर्णवेळ प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य नसल्याने शासनाने संस्था वाऱ्यावर सोडली की काय याबाबतचे वृत्त सोमवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक एस. आर. सूर्यवंशी यांनी आयटीआयला भेट देत सद्यस्थिती जाणून घेतली. संस्थेला पूर्णवेळ प्राचार्य मिळावेत यासाठी मुख्यालयालाकडे लेखी अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.  सातपूर येथे जिल्हास्तरीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) असून संस्थेत विविध प्रकारचे २७ व्यवसाय अभ्यासक्रमासाठी अडीच हजार प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. ५० च्या आसपास निदेशक असून शिक्षकेतर कर्मचारीही आहेत. या संस्थेसाठी एक प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य यांची शासन नियमाप्रमाणे नियुक्ती आहे. जवळपास २०१२ पासून या संस्थेला पूर्णवेळ प्राचार्य उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. तर दोन उपप्राचार्यदेखील पूर्णवेळ दिलेले नाहीत. त्यामुळे संस्थेत वरिष्ठ अधिकारीच नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. संस्थेत एक प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य पदांची नेमणूक असली तरी सद्यस्थितीत कळवण आयटीआयचे प्राचार्य सुभाष कदम यांचेकडे सातपूर आयटीआयचा प्रभारी प्राचार्यांचा पदभार सोपविण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या शासकीय संस्थेला पूर्णवेळ प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य मिळू नयेत याबाबत सोमवारी ‘लोकमत’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची तातडीने दखल घेऊन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक एस. आर. सूर्यवंशी यांनी आयटीआयला भेट देऊन दप्तर तपासणी केली. शिक्षकांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या आणि वर्गावर तसेच वर्कशॉपला भेट देऊन विद्यार्थ्यांच्याही अडचणी ऐकून घेतल्या.मुख्यालयाला  अहवाल पाठवूसंस्थेत आर. एफ. पाटील यांची प्राचार्य म्हणून पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु संचालकांनी पाटील यांना प्रतिनियुक्तीवर मुख्यालयात (मुंबईला) बोलावून घेतलेले आहे. प्राचार्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार मला नाहीत. परंतु पर्यायी व्यवस्था म्हणून कळवण आयटीआयचे प्राचार्य सुभाष कदम यांची प्रभारी म्हणून मी नेमणूक केली आहे. संस्थेला भेट देऊन स्टाफची माहिती घेतली आहे. लवकरच पूर्णवेळ प्राचार्यांची नियुक्ती करावी असा लेखी अहवाल आणि लोकमतमधील बातमी मुख्यालयाला पाठविणार आहे.  - एस. आर. सूर्यवंशी, सहसंचालक

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक