शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

तोतया ‘आयपीएस’ अधिकारी पोलीस आयुक्तालयात येतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 19:49 IST

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भारतीय दंड विधान ३५३ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी

ठळक मुद्दे‘तम्ही मला सॅल्यूट का केला नाही...’ ‘तुम्हाला नोकरी करता येते का? असा प्रश्नही विचारला

नाशिक : ‘तुम्ही काय ड्यूटी करता, तुम्हाला नोकरी करता येते का...,’ असा जाब विचारत एका तोतया आयपीएस अधिकाऱ्याने पोलीस आयुक्तालयात गुरूवारी (दि.२) रात्री अकरा वाजेच्या सुमारास चांगलाच धिंगाणा घातला. नियंत्रण कक्षातील निरिक्षक, उपनिरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी या महाशयाकडे ओळखपत्र मागितले असता, आधारकार्ड दाखवू बोळवण करत ‘मी तुम्हाला काहीही सांगणार नाही, माहिती देणार नाही, तम्ही मला सॅल्यूट का केला नाही...’ असा उलटप्रश्नही केला. या ‘आयपीएस नाट्या’ची आयुक्तालयात खमंग चर्चा रंगली.पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश करत संशयित आरोपी तोतया आयपीएस अधिकारी राजेश बन्सीलाल वाघ (३१, रा.आश्विननगर, सिडको) याने मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक म्हणून कर्तव्यावर असलेले भरत खंडेराव आहिरे यांना ‘मला सीपी साहेबांना भेटून गोपनीय माहिती द्यावयाची आहे, मी आयपीएस आहे...’ असा संवाद साधला. यानंतर आहिरे यांनी वाघ यास नियंत्रण कक्षात घेऊन गेले. यावेळी या महाशयाचा पारा अधिकच चढला आणि नियंत्रण कक्षात पाय ठेवताच त्याने आरडाओरड करत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. यावेळी नियंत्रण कक्ष अधिकारी सहायक निरिक्षक अन्य कर्मचारीदेखील येथे जमले. यावेळी अधिका-यांनी या आयपीएसकडे ओळखपत्राची मागणी करत नाव, गाव, पत्ता याबाबत माहितीची विचारणा केली. यानंतर वाघ याने याबाबत उलटसुलट उत्तरे देत पोलिस अधिकारी व कर्मचाºयांच्या कर्तव्यावरच शंका घेत ‘तुम्हाला नोकरी करता येते का? असा प्रश्नही विचारला. यानंतर मात्र कर्तव्यावर असलेल्या खºया पोलिसांचा पाराही चढला, त्यांनी या महाशयाला चढलेली आयपीएसची झिंग ‘खाकी’च्या शैलीत उतरविली. तत्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्याला माहिती देत पीटर मोबाईल वाहन बोलावून घेत त्याला सरकारी गाडीतून पोलीस ठाण्यात पाठविले. त्याच्याविरूध्द आहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भारतीय दंड विधान ३५३ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीArrestअटक