शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बछड्यांना पाहताच पाझरले तिचे मातृत्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:01 IST

चितेगाव येथील किरण गाढवे यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या दोन बछड्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजºयाच्या साह्याने बाहेर काढले. परिसरात मादी असल्याच्या संशयाने बछडे रात्री त्याच ठिकाणी ठेवले. मध्यरात्रीच्या सुमारास मादी आली आणि बछड्यांना घेऊन गेली. दोन महिन्यांच्या बछड्यांना आपली आई परत मिळाली.

ठळक मुद्देबिबट्याची मादी रात्रीच पिलांना घेऊन गेली वनविभागाच्या मोहिमेला यश

बाजीराव कमानकर । लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : चितेगाव येथील किरण गाढवे यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या दोन बछड्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजºयाच्या साह्याने बाहेर काढले. परिसरात मादी असल्याच्या संशयाने बछडे रात्री त्याच ठिकाणी ठेवले. मध्यरात्रीच्या सुमारास मादी आली आणि बछड्यांना घेऊन गेली. दोन महिन्यांच्या बछड्यांना आपली आई परत मिळाली.चितेगाव शिवारात विहिरीत बिबट्याचे दोन बछडे रात्री आईच्या शोधात भटकत असताना अचानक गाढवे यांच्या विहिरीत पडली. सकाळी विहिरीतून आवाज येत असल्याचे किरण गाढवे यांच्या लक्षात आले. विहिरीत डोकावून पाहिले असता दोन बछडे त्यांना दिसली. त्यांनी दूरध्वनीद्वारे वनविभागाचे अधिकारी संजय भंडारे यांना कळविले. भंडारे यांच्या टीमने घटनास्थळी दाखल होऊन विहिरीतून पिंजºयाच्या साहाय्याने बछड्यांना विहिरीच्या बाहेर काढले. बछडे अवघे दोन महिन्यांचे असल्याने त्यांना आईच्या दुधाची गरज होती. शिवाय इतक्या कमी वयाच्या बछड्यांना आईच्या कुशीची गरज असते म्हणून भंडारे यांनी निफाड येथील नर्सरीत आणले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बछड्यांना तपासून दिले. कोणतीही जखम नसल्याचे सांगितले. मात्र आईच्या कुशीत आणि दुधाची आवश्यकता असल्याने पुन्हा चितेगाव येथील नागरिक, वनविभागाचे अधिकारी यांच्या संगमताने आई बछड्यांची भेट घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी बछड्यांना ज्या विहिरीतून बाहेर काढले होते, तेथे आणून ठेवले. ममत्व केवळ माणसात रहाते, असं नाही तर जीव सृष्टीच्या प्रत्येक मादीमध्ये आईचे ममत्व जागृत होते. आई मुलांची भेट झाल्याचे अनेक ठिकाणी ऐकले असले तरी आज मात्र पशुमध्येदेखील आई, लेकरांची माया अपवाद नाही.

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीवleopardबिबट्या