शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

मुख्यमंत्र्यांचा ताफा पोलिसांच्या दोराला अडकतो तेव्हा़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:21 IST

शेल्टर प्रदर्शनासाठी शहरात आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा शरणपूररोड सिग्नलवर अपघात होता होता वाचला़ शहर वाहतूक पोलिसांनी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास शरणपूर सिग्नलवर लावलेल्या दोरास दोन वाहने अडकताना वाचली, तर एक शासकीय वाहन सरळ दक्षिणमुखी मारुती मंदिराकडे निघाले़ एरवी दंडवसुलीत मग्न असलेल्या शहर वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचा प्रत्यय यानिमित्ताने आला़

नाशिक : शेल्टर प्रदर्शनासाठी शहरात आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा शरणपूररोड सिग्नलवर अपघात होता होता वाचला़ शहर वाहतूक पोलिसांनी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास शरणपूर सिग्नलवर लावलेल्या दोरास दोन वाहने अडकताना वाचली, तर एक शासकीय वाहन सरळ दक्षिणमुखी मारुती मंदिराकडे निघाले़ एरवी दंडवसुलीत मग्न असलेल्या शहर वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचा प्रत्यय यानिमित्ताने आला़  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेल्टर प्रदर्शनातील कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचा व पोलिसांचा ताफा हा कॅनडा कॉर्नरमार्गे शरणपूररोड सिग्नलकडे येत होता़ याठिकाणी वाहतूक पोलिसांनी मायको सर्कलकडे जाणाºया रस्त्यावर दोर बांधून ठेवलेला होता़ पोलिसांना हा दोर काढण्याचा विसर पडला की काय, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यापैकी एक पांढºया रंगाचे वाहन सिग्नलवरून सरळ दक्षिणमुखी मारुती मंदिराकडे जाऊ लागले, तर उर्वरित दोन वाहने या बांधलेल्या दोराच्या अगदी समीप जाऊन थांबले आणि एकमेकांवर आदळून होणारा अपघात होता होता वाचला़  वाहतूक पोलीस कर्मचाºयाच्या हा प्रकार लक्षात येताच त्याने धावत येऊन तत्काळ दोर सोडला व तिन्ही वाहने मायको सर्कलकडे रवाना झाली़  दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समृद्धी महामार्गबाधित शेतकरी काळे झेंडे दाखविणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यामुळे पोलिसांनी मुख्यमंत्री जाणार असलेल्या रस्त्यावर जागोजागी वाहतूक पोलीस तैनात करण्याबरोबरच बॅरिकेडिंग केले होते़ बंदोबस्ताचा नागरिकांना फटका  वरिष्ठ पोलीस अधिकाºयांसह राज्य राखीव पोलीस बल, राखीव पोलीस दल यांच्या तुकड्या व त्यांची वाहने रस्त्यावर उभी ठेवण्यात आली होती़ तसेच या कालावधीत रस्त्याने पायी तसेच वाहनाने जाणाºयांना पोलिसांकडून हाकलले जात होते़   यामुळे शेल्टर प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही काही काळ ताटकळत बसावे लागले़ विशेष म्हणजे, एका निमंत्रितालाच पोलिसांनी प्रवेश नाकारण्याची घटना घडली़   चोख पोलीस बंदोबस्ताचा फटका अनेकांना बसला. वाहने थांबवून धरण्यात आल्याने अनेकांची गैरसोय झाली.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीtraffic policeवाहतूक पोलीस