शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

...जेव्हा नाशिकच्या रु ग्णाचा मृतदेह भोपाळच्या दिशेने रवाना होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 01:29 IST

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षातून उत्तरीय तपासणी होऊन संबंधित नातेवाइकांद्वारे ओळख पटवून प्रशासनाकडून दोन्ही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सोपविण्यात आले खरे; मात्र नाशिकचा मृतदेह थेट भोपाळच्या दिशेने आणि भोपाळवासीय मृत व्यक्तीचा मृतदेह नाशिककर कुटुंबीयांकडे आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने नातेवाइकांची चूक असल्याचे सांगितले आहे.

ठळक मुद्देजिल्हा शासकीय रु ग्णालय : नातेवाइकांनी पटविली ओळख

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षातून उत्तरीय तपासणी होऊन संबंधित नातेवाइकांद्वारे ओळख पटवून प्रशासनाकडून दोन्ही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सोपविण्यात आले खरे; मात्र नाशिकचा मृतदेह थेट भोपाळच्या दिशेने आणि भोपाळवासीय मृत व्यक्तीचा मृतदेह नाशिककर कुटुंबीयांकडे आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने नातेवाइकांची चूक असल्याचे सांगितले आहे.गेल्या शनिवारी संध्याकाळच्या सुमारास दोन मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर ते त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले, मात्र यावेळी दोन्ही कुटुंबीयांची गफलत झाल्याने मृतदेह ताब्यात घेताना व रुग्णवाहिकेत ठेवताना आदलाबदल झाल्यामुळे नाशिककर मयत व्यक्तीचा मृतदेह भोपळच्यारुग्णवाहिकेत आणि भोपाळस्थित मयत व्यक्तीचा मृतदेह नाशिकच्या कुटुंबीयांकडे आला.दरम्यान, हा सगळा प्रकार नाशिककर कुटुंबीयांकडून मृतदेहाच्या अंत्यसंस्कारला घेऊन जात असताना निदर्शनास आला. त्यामुळे तत्काळ नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली.मृतदेह आदलाबदलचा हा सगळा प्रकार नातेवाइकांच्या चुकीमुळे घडल्याचे स्पष्ट आहे. कारण दोन्ही कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेताना नातेवाइकांनी ओळख पटविली होती.त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून काही हलगर्जीपणा झालेला नाही. संबंधित नातेवाइकांची नोंद स्वाक्षरीसह रुग्णालयाच्या दप्तरी आहे,रुग्णालय प्रशासाने सांगितले.याबाबत दिवसभर चर्चा सुरू होती.टोलनाक्यावर मध्यरात्री मृतदेहांचा ताबानाशिककर कुटुंबातील सदस्यांनी भोपाळच्या दिशेने निघालेल्या रु ग्णवाहिकेच्या नातेवाइकांचा संपर्कक्र मांक मिळवून तत्काळ त्यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. यामुळे त्वरित चांदवडजवळील टोलनाक्यावर भोपाळकडे जाणारी रु ग्णवाहिका थांबविण्यात आली. त्यानंतर नाशिक कुटुंबीयांनी त्यांच्याजवळ असलेला भोपाळस्थित व्यक्तीचा मृतदेह घेऊन रु ग्णवाहिकेने चांदवड घाठले आणि मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास या दोन्ही कुटुंबांनी एकमेकांच्या मयत नातेवाइकांची पुन्हा खात्रीपूर्वक ओळख पटवून मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेह आदलाबदलचा सगळा प्रकार नेमका जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला की नातेवाइकांच्या चुकीमुळे, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल