शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीस वृक्षांची कत्तल करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 12:38 IST

इंदिरानगर : येथील कलानगर चौकालगत असलेल्या रत्ना हाईट्ससमोर महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर असलेल्या सुमारे छत्तीस वृक्षांची कत्तल करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी श्री विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.रत्ना हाईट्ससमोरील महापालिकेचा भूखंड सुमारे दहा वर्षांपासून गाजरगवत आणि काटेरी वृक्षांनी व्यापला होता. त्यामुळे मनपाच्या भूखंडास बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. याची ...

ठळक मुद्देकलानगर : विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्टने केली मागणी

इंदिरानगर : येथील कलानगर चौकालगत असलेल्या रत्ना हाईट्ससमोर महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर असलेल्या सुमारे छत्तीस वृक्षांची कत्तल करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी श्री विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.रत्ना हाईट्ससमोरील महापालिकेचा भूखंड सुमारे दहा वर्षांपासून गाजरगवत आणि काटेरी वृक्षांनी व्यापला होता. त्यामुळे मनपाच्या भूखंडास बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. याची दखल श्री विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी घेऊन सदर भूखंडावरील गाजरगवत आणि काटेरी वृक्षांची छाटणी करून स्वच्छता मोहीम आणि जमिनीचे सपाटीकरण स्वखर्चाने केले होते. दहा महिन्यांपूर्वी श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त ट्रस्टच्या वतीने छत्तीस झाडांचे रोपण नगरसेवकांच्या हस्ते केले होते. यामध्ये वड, पिंपळ, उंबर, चिंच, सोनचाफा, फणस, पारिजात, मोह यांसह विविध झाडांचा समावेश होता. दर रविवारी आणि बुधवारी ट्रस्टचे सर्व सदस्य पाणी देत होते. ही झाडे आठ फूट उंची एवढी होती. परंतु वीस दिवसांपूर्वी सदर भूखंडावर जॉगिंग ट्रॅक कामाचे भूमिपूजन नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, अ‍ॅड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, सुनील खोडे, सचिन कुलकर्णी यांसह नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी संबंधित ठेकेदाराला नागरिकांनी आणि प्रभागाच्या नगरसेवकांनी या छत्तीस वृक्षांना कोणतीही हानी न पोहोचवता जॉगिंग ट्रॅकचे काम करावे, अशी सूचना दिली होती. तरीही ठेकेदाराने सर्व वृक्षांची कत्तल करून जमिनीचे सपाटीकरण केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. संबंधित ठेकेदारावर वृक्षांची कत्तल केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी श्याम विश्वकर्मा, अशोक विश्वकर्मा, राजेंद्र भालेराव, प्रकाश चव्हाण, ओमप्रकाश विश्वकर्मा, राजेश शर्मा, विनोद विश्वकर्मा आदींनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcidcoसिडकोenvironmentवातावरण