शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

व्हीलचेअरने दिव्यांग पोहोचले मतदान केंद्रांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 00:56 IST

Maharashtra Assembly Election 2019 दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सुविधांमुळे दिव्यांगांचा मतदानप्रक्रियेतील सहभाग वाढला असल्याचे दिसून आले. मॅपिंग करण्यात आलेल्या दिव्यांग मतदारांना आवश्यकतेनुसार व्हीलचेअर पुरविण्यात आल्याने मतदान केंद्रांपर्यंत पोहोचून दिव्यांगांना मतदान करणे सुलभ झाले.

नाशिक : दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सुविधांमुळे दिव्यांगांचा मतदानप्रक्रियेतील सहभाग वाढला असल्याचे दिसून आले. मॅपिंग करण्यात आलेल्या दिव्यांग मतदारांना आवश्यकतेनुसार व्हीलचेअर पुरविण्यात आल्याने मतदान केंद्रांपर्यंत पोहोचून दिव्यांगांना मतदान करणे सुलभ झाले.दिव्यांग मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दिव्यांगांना अनेकविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार दिव्यांगांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी सुमारे ४५० व्हीलचेअर्स आणि वाहनांची व्यवस्था असल्याने दिव्यांग बांधव मतदान केंद्रांवर पोहोचू शकले.जिल्ह्यातील काही भागात दिव्यांगांना आणण्यासाठी शासनाचे वाहन पाठविण्यात आले तर सेक्टर आॅफिसरच्या गाडीमधूनदेखील दिव्यांग मतदार मतदानासाठी आले. मागणी करण्यात आल्यानुसार दिव्यांगांना आणण्यासाठी व्हीलचेअर्सदेखील पाठविण्यात आल्या.अनेक सेवाभावी संस्थांनीदेखील व्हीलचेअरची सुविधा पुरवून दिव्यांग मतदारांना सहकार्य केले. शहरातील उर्दू हायस्कूल येथे सेवाभावी संस्थांच्या अनेक कार्यकर्त्यांनी केंद्रावर आलेल्या दिव्यांग मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहोचविले. केंद्रातील प्रवेशद्वारावर रॅम्पची व्यवस्था करण्यात आली होती. तर अंध मतदारास एक मदतनीस बरोबर नेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यांच्यासाठी ब्रेल मतपत्रिकादेखील देण्याची व्यवस्था करण्यात आली.जिल्हा प्रशासनाकडून सुरुवातीला राबविण्यात आलेल्या मोहिमेत प्रारंभी दहा हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर अपंगांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांची मदत घेऊन आणखी दिव्यांगांपर्यंत पोहोचण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून दिव्यांग मतदारांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी वरच्या मजल्यावरील मतदान केंद्रे ही यापूर्वीच खालच्या मजल्यावर आणण्यात आलेली आहेत.जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सुविधांमुळे दिव्यांगांचा मतदानप्रक्रियेतील सहभाग वाढला असल्याचे दिसून आले. मॅपिंग करण्यात आलेल्या दिव्यांग मतदारांना हीलचेअर पुरविण्यात आल्याने मतदान केंद्रांपर्यंत पोहोचून दिव्यांगांना मतदान करणे सुलभ झाले.अनेक सेवाभावी संस्थांनीदेखील व्हीलचेअरची सुविधा पुरवून दिव्यांग मतदारांना सहकार्य केले. शहरातील उर्दू हायस्कूल येथे सेवाभावी संस्थांच्या अनेक कार्यकर्त्यांनी केंद्रावर आलेल्या दिव्यांग मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहोचविले. केंद्रातील प्रवेशद्वारावर रॅम्पची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानNashikनाशिक