शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

निकाल काहीही लागो, इतिहास घडणारच!

By धनंजय वाखारे | Published: May 04, 2019 1:37 AM

जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य वेअर हाउसमध्ये ठेवलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये बंदिस्त असल्याने सर्वांना २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. मात्र, जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात निकाल काहीही लागो, इतिहास मात्र घडणार आहे. इतिहासाच्या पानात कोणाची नोंद होईल, याबाबत आता औत्सुक्य वाढले आहे.

ठळक मुद्देनाशिक, दिंडोरी लोकसभा : इतिहासाच्या पानात कोणाची होणार नोंद? मतदारांमध्ये वाढले औत्सुक्य

नाशिक : जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य वेअर हाउसमध्ये ठेवलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये बंदिस्त असल्याने सर्वांना २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. मात्र, जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात निकाल काहीही लागो, इतिहास मात्र घडणार आहे. इतिहासाच्या पानात कोणाची नोंद होईल, याबाबत आता औत्सुक्य वाढले आहे.नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण १८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या मतदारसंघात ५९.४० टक्के मतदान झाले. २०१४ च्या तुलनेत सुमारे दीड टक्क्याने वाढ झालेली आहे. निवडणुकीत प्रामुख्याने, तिरंगी लढत दिसून आली. त्यात युतीचे हेमंत गोडसे, आघाडीचे समीर भुजबळ आणि भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी रंगत आणली. आता निवडणुकीच्या आकडेमोडीत उमेदवारांसकट कार्यकर्ते व्यग्र असले तरी निकाल काहीही लागो, या मतदारसंघात यंदा इतिहासाच्या पानात भर पडणार आहे. निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत गोडसे हे विजयी झाले तर सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून येण्याचा ४८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला जाऊ शकतो.नाशिक लोकसभा मतदारसंघात १९६७ आणि १९७१ मध्ये भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसचे भानुदास रामचंद्र कवडे हे निवडून आले होते. मात्र, त्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघातून एकदा निवडून गेलेला खासदार पुन्हा निवडून आलेला नाही. गोडसे हे भुजबळांवर मात करून पुन्हा निवडून आले तर ४८ वर्षानंतर विक्रम मोडीत काढण्याची त्यांना संधी आहे.निवडणुकीत आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी बाजी मारली तर गोविंद हरी देशपांडे यांच्याप्रमाणे दोनवेळा खासदारकी भूषविण्याची नोंद त्यांच्या नावावर होऊ शकते. १९५१मध्ये भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसकडून गो. ह. देशपांडे यांनी निवडणूक लढविली आणि जिंकली होती. मात्र, नंतर १९५७च्या निवडणुकीत त्यांना भाऊराव गायकवाड यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, १९६२ च्या निवडणुकीत त्यांनी भाऊराव गायकवाड यांचा पराभव करुन पुन्हा विजय संपादन केला होता. समीर भुजबळ यांनी २००९ मध्ये हेमंत गोडसे यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. त्यावेळी भुजबळ यांनी बाजी मारली होती. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत राष्टÑवादीने त्यांच्याऐवजी छगन भुजबळ यांना रिंगणात उतरविले होते. तसे पाहिले तर समीर भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव पाहिलेला नाही. यंदा ते पुन्हा निवडून आले तर पराभव न पाहिलेला खासदार म्हणून त्यांची इतिहासात नोंद होईल.नाशिक लोकसभा निवडणुकीप्रमाणेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही निकाल काहीही लागला तरी इतिहास घडणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून ६५.६४ टक्के मतदान झाले आहे.भारती पवार यांचे श्वसुर माजी मंत्री ए. टी. पवार यांनी नऊ वेळा विधानसभेवर निवडून जायचा विक्रम केला परंतु, १९७१ मध्ये मालेगाव मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. भारती पवार या निवडून आल्या तर सासºयांचे स्वप्न सुनेकडून पूर्ण होण्याची नोंदही घेतली जाणार आहे.दिंडोरी मतदारसंघातून आघाडीचे धनराज महाले निवडून आले तर जिल्ह्यातून बाप-बेटे खासदार म्हणून निवडून जाण्याची नोंद इतिहास घेईल. धनराज महाले यांचे वडील हरिभाऊ महाले यांनी मालेगाव लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत तीनवेळा संसदेत प्रतिनिधित्व केले आहे. माकपचे आमदार जे. पी. गावित यांनी विजय संपादन केल्यास जिल्ह्यातून माकपचा खासदार निवडून जाण्याची पहिली वेळ असणार आहे. या विक्रमाचीही नोंद इतिहासात घेतली जाईल.त्यामुळे दोन्ही मतदारसंघात निकाल काहीही लागला तरी इतिहासाच्या पानात भर पडणार असून तो मान कुणाला मिळतो, याबाबतची उत्सुकता आता ताणली गेली आहे.अपक्ष उमेदवारामुळे चुरसभाजप बंडखोर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनीही निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. लोकसभेचा मतदारसंघ मोठा असतो़ त्यामुळे येथे अपक्ष उमेदवारांची डाळ फारशी शिजताना दिसत नाही़ राज्यातील अनेक मतदारसंघांप्रमाणे आजवर नाशिक लोकसभा मतदारसंघातून एकही अपक्ष उमेदवार लोकसभेसाठी निवडून येऊ शकलेला नाही. माणिकराव कोकाटे यांनी यंदा बाजी मारली तर पहिला अपक्ष खासदार म्हणून त्यांची इतिहासात नोंद होऊ शकेल....तर गोडसेंच्या नावावर आगळा विक्रमनाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत गोडसे हे विजयी झाल्यास एक आगळा विक्रम त्यांच्या नावावर होऊ शकतो. हेमंत गोडसे यांनी २०१४च्या निवडणुकीत राष्टÑवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचा पराभव केला होता. भुजबळांवरील या विजयामुळे गोडसे हे जायंट किलर ठरले होते. आता हेमंत गोडसे यांचा सामना छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्याशी होत आहे. गोडसे पुन्हा निवडून आले तर काका-पुतण्याचा पराभव होण्याचा विक्रम गोडसे यांच्या नावावर लागू शकतो.राष्टÑवादीतून भाजपत गेलेल्या डॉ. भारती पवार, शिवसेनेतून राष्टÑवादीत गेलेले धनराज महाले आणि माकपचे आमदार जे.पी. गावित यांच्यात प्रमुख लढत बघायला मिळाली. युतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार या निवडून आल्या तर जिल्ह्यातून पहिली महिला खासदार होण्याचा विक्रम त्यांच्या नावे नोंदविला जाईल.आजवर जिल्ह्यातून एकही महिला खासदार होऊ शकलेली नाही. यापूर्वी शांताबाई दाणी यांनी दोनवेळा तर अन्य काही महिलांनी अपक्ष म्हणून नशीब आजमावले होते. परंतु, त्यांच्या पदरी अपयशच पडले आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत भारती पवार यांनी दिंडोरी मतदारसंघातूनच निवडणूक लढविली; मात्र त्यांचा पराभव झाला होता.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिकdindori-pcदिंडोरी