शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याचा चमचा घेउन आलेल्यांना मदतीचे मूल्य काय कळणार?; दादा भुसे

By संकेत शुक्ला | Updated: August 17, 2024 18:04 IST

दंगलीची घटना दुर्दैवी; सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू

संकेत शुक्लनाशिक : राज्य शासनाने बहिणींना दिलेल्या मदतीमुळे सावत्र भावा बहिणींच्या पोटात दुखू लागले आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना १५०० रुपयांचे मूल्य काय समजणार असा टोला पालकमंत्री दादा भुसे यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला. नाशिक शहरातील जुन्या नाशिक परिसरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (दि. १७) जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने बैठक घेतली. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

लाडकी बहीण योजनेवर टीका करताना आघाडीच्या नेत्यांसह सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना त्यांनी हे वक्तव्य केले. सरकार परत यावे म्हणून ही लाच असल्याची टीका करताना तुम्हाला लाज वाटत नाही, तुम्ही एकप्रकारे बहिणींची थट्टा करीत आहात. तुमचे सरकार होते तेव्हा तुम्ही मदत देण्याऐवजी काय प्रकार केले हे जनतेला माहिती आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने ते हे आरोप करीत असल्याचेही भुसे म्हणाले.

योजनेची कितीही टिंगलटवाळी केली तरी मायबहिणांसाठी ही योजना राबविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यावर तीन दिवसांपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, काही लोकांकडून योजनेला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत आहे. खात्यात जमा झालेले पैसे काढता येणार आहे का ? असा सवाल उपस्थितीत करीत, योजनेकडे राजकीय हेतूने बघू नये. बेताल वक्तव्यांनी गर्दीच्या ठिकाणी काही अपघात झाल्यास जबाबदार कोण असेल ? असा सवाल करीत राजकीय नेत्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे, असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, आदी उपस्थित होते.