शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

...असा माझा कोणता गुन्हा होता?

By संजय वाघ | Updated: February 17, 2020 01:54 IST

नात्यांची पहिली ओळख तशी रक्ताच्या नात्यांपासून होते. ती वीण जसजशी वाढत जाते, त्यानुसार अन्य गोतावळ्याची त्यात भर पडत जाते. वयोमानपरत्वे आणि आपल्या वागण्या-बोलण्यानुसारही काही नात्यांची निर्मिती कळत-नकळत होत जाते. तरीदेखील सुख-दु:खाचे प्रसंग जेव्हा उद्भवतात तेव्हा रक्तनात्याचा क्रम अग्रभागी असतो आणि तो स्वाभाविकही मानला जातो. असे असताना लासलगाव बसस्थानकावर शनिवारी सायंकाळी जळीत महिलेच्या निमित्ताने यासंबंधी भ्रमनिरास करणारे चित्र पहावयास मिळाले व त्याचीच चर्चा नागरिकात होत असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देपीडितेचा सवाल : लासलगावच्या महिला जळीत प्रकरणात नातेवाईकांची तटस्थता

नाशिक : नात्यांची पहिली ओळख तशी रक्ताच्या नात्यांपासून होते. ती वीण जसजशी वाढत जाते, त्यानुसार अन्य गोतावळ्याची त्यात भर पडत जाते. वयोमानपरत्वे आणि आपल्या वागण्या-बोलण्यानुसारही काही नात्यांची निर्मिती कळत-नकळत होत जाते. तरीदेखील सुख-दु:खाचे प्रसंग जेव्हा उद्भवतात तेव्हा रक्तनात्याचा क्रम अग्रभागी असतो आणि तो स्वाभाविकही मानला जातो. असे असताना लासलगाव बसस्थानकावर शनिवारी सायंकाळी जळीत महिलेच्या निमित्ताने यासंबंधी भ्रमनिरास करणारे चित्र पहावयास मिळाले व त्याचीच चर्चा नागरिकात होत असल्याचे दिसून आले.शनिवारी (दि.१५) संध्याकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास लासलगाव बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने गजबजले होते. प्रवासी बसच्या प्रतीक्षेत असताना त्याच आवारातील एका कोपऱ्यात दुसरे लग्न करण्याच्या कारणावरून एक युवक आणि महिला यांच्यात वाद सुरू होता. कोणाला काही कळण्याच्या आत पेट्रोलचा भडका उडाला आणि संबंधित महिला गंभीररीत्या भाजली. उपस्थितांनी माणुसकीच्या भावनेतून त्या महिलेला विझविले.तोपर्यंत आगारप्रमुख एस. एम. शेळके यांनी पोलीस व रुग्णवाहिकेला तत्काळ कळवून बोलावूनही घेतले आणि तिची रवानगी तातडीच्या उपचारासाठी लासलगावच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम शेंद्रे यांनी पीडितेवर प्राथमिक उपचार केले, मात्र पीडिता ६७ टक्क्याहून अधिक भाजल्याने तिला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी अन्य दोन तरुणांच्या मदतीने पीडितेला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने शासकीय रुग्णालयात आणले. या सर्व घटनाक्रमात, अशा प्रसंगात रुग्णाला सर्वाधिक गरज असते ती आपल्या कुटुंबीयांकडून मिळणाºया मानसिक आधाराची. तो त्या पीडितेला घटनेनंतर सहा तास उलटेपर्यंत मिळाला नसल्याचे दिसून आले.बिकट प्रसंगात नात्यागोत्याच्या नसलेल्या माणसांनी धावूत येत माणुसकीचे दर्शन घडवावे आणि रक्ताच्या नात्याने मात्र आपल्याकडे पाठ फिरवावी, असा आपण कोणता गुन्हा केला होता असाच तर सवाल त्या दुर्दैवी पीडितेला अस्वस्थ करीत नसेल?वास्तविक एखाद्या दुर्घटनेनंतर संबंधित व्यक्ती गुणी आहे की अवगुणी याचा विचार न करता ती केवळ आपल्या रक्ताची आहे या एकाच मुद्द्यावर कुटुंबातील सदस्य धावाधाव करतात, ती व्यक्ती बरी व्हावी यासाठी नानाविध दवाखान्याचे उंबरे झिजवितात, प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, तिला वाचविण्यासाठी प्रसंगी दुवाही मागतात. हा अनुभव सर्वत्र येत असताना या पीडितेच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी कुटुंबातील एकाही सदस्याने प्रारंभीच्या काळात पुढे येऊ नये हिच बाब जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींना खटकत राहिली.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य