शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

घरदार नसलेल्या मोदींना  इतरांची उठाठेव कशासाठी? :  शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:31 IST

नवीन हिंदुस्तान उभा करण्यासाठी गांधी घराण्याने दिलेले बलिदान विसरून त्यांची टिंगलटवाळी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सांगण्यासारखे काही शिल्लक आहे काय? असा सवाल करीत घरदार नसलेल्यांना इतरांची उठाठेव कशासाठी?

नांदगाव : नवीन हिंदुस्तान उभा करण्यासाठी गांधी घराण्याने दिलेले बलिदान विसरून त्यांची टिंगलटवाळी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सांगण्यासारखे काही शिल्लक आहे काय? असा सवाल करीत घरदार नसलेल्यांना इतरांची उठाठेव कशासाठी? असा हल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नांदगाव येथे आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चढविला.न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर या सभेत बोलताना पवार म्हणाले, गांधी कुटुंबानंतर आता नरेंद्र मोदी माझ्यावर वैयक्तिक हल्ले करीत आहेत. त्यांना कुटुंबव्यवस्था काय हे माहिती आहे काय? असा प्रश्न विचारीत शरद पवार यांनी ज्यांना घरदार नाही त्यांनी इतरांचीही उठाठेव का करावी? माझ्या घराण्यावर व्यक्तिगत हल्ले करण्याऐवजी मोदी यांनी देशातील शेतकरी, शेतमजूर, कामगार यांची चिंता करावी. पाच वर्षांचा कालखंड कसा गेला, काय विकास केला ते आधी देशाला सांगा.  मोदी हे देशो-देशी फिरले; पण विकासाचे मॉडेल कुठेच उभे केले नाही. मोदींना विकासाच्या मॉडेलवर बोलायला वेळ नसल्याची टीकाही शरद पवार यांनी केली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही मोदी यांच्यावर जोरदार टीकास्र सोडले.याप्रसंगी उमेदवार धनराज महाले, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्षतुषार शेवाळे, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार अनिल आहेर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे, प्रसाद हिरे, माजी  आमदार उत्तम भालेराव, माजी खासदार देवीदास पिंगळे, ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील आदींसह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.नार-पारचा प्रश्न सोडवूनिवडणुकीच्या कामातून मोकळे झाल्यावर माझ्याकडे या. आपण नार-पारचा पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू, असा शब्द नांदगावकरांना शरद पवार यांनी दिला. तत्पूर्वी, याविषयी माजी आमदार अनिल आहेर, आमदार पंकज भुजबळ यांनी नांदगावला नार-पारचे पाणी मिळावे, असे साकडे घातले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdindori-pcदिंडोरीSharad Pawarशरद पवारChagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेस