शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी उपस्थित राहत नसतील तर आम्ही भिंतींशी बोलायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 14:17 IST

विधी सभापतींचा उद्विग्न सवाल : अधिकाऱ्याच्या गैरहजेरीमुळे सलीम शेख यांचा सभात्याग

ठळक मुद्देमहापालिकेच्या विषय समित्या गठित झाल्यापासूनअधिकारीवर्गाकडून बोळवणअधिकाऱ्याना समितीचे कामकाजच चालवायचे नसेल तर समिती बरखास्त करून टाकण्याची मागणी

नाशिक - महापालिकेच्या विषय समित्या गठित झाल्यापासून त्यांची अधिकारीवर्गाकडून कशाप्रकारे बोळवण सुरू आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा विधी समितीच्या बैठकीच्या निमित्ताने आला. विधी, अतिक्रमण आणि बांधकाम वगळता अन्य खात्यांच्या अधिकाऱ्यानी बैठकीला दांडी मारल्याने संतप्त झालेल्या सभापती शीतल माळोदे यांनी ‘आम्ही भिंतींशी बोलायचे काय’ असा उद्विग्न सवाल केला तर मनसेचे ज्येष्ठ सदस्य सलीम शेख यांनी सभात्याग करत प्रशासनाचा निषेध केला.विधी समितीची मागील बैठकही अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीमुळेच तहकूब करण्यात आली होती. शनिवारी (दि.२) पुन्हा बोलाविलेल्या सभेलाही केवळ तीनच विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अर्धा तास प्रतीक्षा करुनही अधिकारी उपस्थित झाले नाहीत. अधिकाऱ्याच्या या गैरहजेरीबद्दल मनसेचे गटनेते व समितीचे सदस्य सलीम शेख यांनी कडक शब्दांत हजेरी घेतली. अधिकारी सोईस्कररित्या गैरहजर राहत असल्याचा आरोप करत सलीम शेख यांनी अधिकाऱ्याना समितीचे कामकाजच चालवायचे नसेल तर समिती बरखास्त करून टाकण्याची मागणी केली. समितीच्या बैठकीला एकदा आयुक्तांनाच पाचारण करावे, म्हणजे समितीचे कामकाज कसे चालते, याचे दर्शन त्यांना होईल, असेही सलीम शेख यांनी सांगितले. विषयपत्रिकेवर प्रस्ताव देऊन महिन्याचा कालावधी लोटला तरी त्याची उत्तरे देण्यासाठी आस्थापना विभागाचा अधिकारी उपस्थित नसल्याने सलीम शेख यांनी अखेर प्रशासनाचा निषेध नोंदवत सभात्याग केला. सभापती शीतल माळोदे यांनीही अधिकाऱ्याच्या गैरहजेरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. अधिकारीच हजर राहत नसतील तर आम्ही भिंतींशी बोलायचे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, बैठकीत महापालिकेमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या वकीलांच्या पॅनलवरील विधीतज्ज्ञांची मासिक सभा विधी समिती व विधी विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावेळी नगररचना विभागातील न्यायालयात दाखल दाव्यांची माहिती सभापतींनी विचारली असता विधी विभाग प्रमुख बी. यु. मोरे यांनी त्याबाबतीत एकत्रित माहिती पुढील सभेत देण्यात येईल, असे सांगितले. सलीम शेख यांनी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या चौकशीसाठी समितीवर नेमलेल्या अधिकाऱ्याची माहिती मागविली होती परंतु, सदर प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आस्थापना विभागाचे अधिकारीच उपस्थित नसल्याने सलीम शेख यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका