शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

हे कसले एकवचनी, हे तर सत्तापिपासू - सुषमा अंधारे

By दिनेश पाठक | Updated: January 23, 2024 13:47 IST

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप तसेच शिंदे गटाला नाशिकच्या राज्यव्यापी अधिवेशनात लक्ष केले.

नाशिक :  शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप तसेच शिंदे गटाला नाशिकच्या राज्यव्यापी अधिवेशनात लक्ष केले. त्या म्हणाल्या की, नाशिक हे ड्रग्ज माफियांचे झाले आहे. फक्त आमची पांढरी दाढी आहे म्हणून आम्ही स्वच्छ आहोत, असा ढोंगीपणा करताय असे सांगून अंधारे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांना ड्रग्स प्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पण नाशिक ही वीर सावरकर, प्रभू राम यांची भूमी देखील आहे. 

याच भूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह आंदोलन केले होते पण या पवित्र भूमिस ड्रग्ज माफियांनी प्रदूषित केल्याचे सांगत यासाठी सत्ताधारीच जबाबदार असल्याचे सांगितले. प्रभू श्री राम एकवचणी, एकपत्नी होते. त्यांनी नेहमी पत्नी सिता यांना मान, सन्मान दिला आजचे स्वयंघोषित विश्वगुरू मात्र पत्नीस वनवासात पाठवून अयोध्येमध्ये एकटेच पूजा करत होते, असा हल्लाबोल करून अंधारे यांनी मोदी यांनाही लक्ष केले. 

सत्तरहजार कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप अजित पवार यांच्यावर मोदी यांनी केला आणि ७२ तासातच मोदी यांचे कार्यकर्ते पवार यांना मांडीला मांडी लावून बसले ही कसले सत्यवचणी. राज्यात महिला सुरक्षित नाही आणि महिला धोरणाच्या गप्पा मारतात. आणि दुसरीकडे संसद तसेच राम मंदिराच्या उद्घाटनास महिला असलेल्या राष्ट्रपतींना बोलावले नाही, असे सांगून भाजपाचे लोक फक्त गप्पाच मारतात, असे अंधारे यांनी सांगितले. राज्यात सुडाचे राजकारण चालू असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पाताळयंत्री असल्याची टीका अंधारे यांनी केली.

राणे यांचे नाव न घेता टीकासुषमा अंधारे यांनी निलेश व नितेश राणे यांचे नाव न घेता टीका केली. चार फुटाचे टील्ले- पिल्ले उठतात आणि आरोप करतात. यांची लायकी आहे का आरोप करण्याची, असा घणाघात केला.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेNashikनाशिकShiv Senaशिवसेना