शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
2
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
3
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
4
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
5
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
6
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
7
देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार; २०२६ जूनपर्यंत…
8
आजचे राशीभविष्य : बुधवार ७ जानेवारी २०२६; आजचा दिवस शुभ फलदायी, विविध स्तरांवर लाभ संभवतात
9
जि.प. निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात? १२ जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात
10
मुंबईची निवडणूक ठरविणार ‘ठाकरे ब्रँड’चे भवितव्य; उद्धव यांच्यासमोर दुहेरी आव्हान अन् कसोटी
11
प्रचाराला ‘बिन’विरोधाची धार, दादांवर ‘सिंचन’वरून प्रहार; राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात जुंपली
12
“विलासराव देशमुख यांच्या आठवणी कोणीही पुसू शकत नाही”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
सभेसाठी मैदान दिले जात नाही: संजय राऊतांचा दावा; ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर एकच मोठी सभा
14
मराठी टक्का वाढवण्यास ठोस आराखडा आहे का? गेली २० वर्षे ज्यांची सत्ता होती…: प्रकाश आंबेडकर
15
जनतेचे प्रश्न सोडवण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांनाच प्रचारसभांसाठी मैदान मिळेना...!
16
राहुल नार्वेकरांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज नाकारल्याचा आरोप; ८ उमेदवार हायकोर्टात
17
एमसीए निवडणुकीसाठी दोन महिन्यांत ४०० सभासदांची नोंदणी झाली कशी?
18
जेम्स लेनच्या पुस्तकातील शिवरायांवरील अवमानकारक लिखाणाबाबत २२ वर्षांनी ऑक्सफर्डने मागितली माफी
19
एमआयएमला अध्यक्ष नसला तरी फरक पडत नसल्याचा दावा; जागावाटपावरून मतभेद अन् राजीनामा
20
सोनिया गांधी यांना श्वसनाचा त्रास, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

विहीर खोदकामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:42 IST

सिन्नर : तालुक्यातील नवीन विहिरींच्या कामाला वेग आला असून, अनेक ठिकाणी विहिरींचे खोदकाम सुरू असल्याचे चित्र आहे. शेतात जुन्या विहिरी असल्या तरी शेतीचे वाटे झाल्यानंतर नवीन विहिरींची गरज दिवसेंदिवस भासत आहे. त्यातच आता पाणी पातळी खूप खालावल्याने विहिरींची खोलीही वाढवावी लागत आहे. अनेक शेतकरी ओढ्याजवळ किंवा पाणाड्यांकडून जागा पाहून विहीर खोदण्यास प्राधान्य देत आहे.

ठळक मुद्देटंचाईच्या झळा : नवीन स्रोत शोधण्यासाठी धडपडमेहनतीच्या मानाने मोबदला मिळत नसल्याचे विहीर खोदकामगारांचे म्हणणे

सिन्नर : तालुक्यातील नवीन विहिरींच्या कामाला वेग आला असून, अनेक ठिकाणी विहिरींचे खोदकाम सुरू असल्याचे चित्र आहे. शेतात जुन्या विहिरी असल्या तरी शेतीचे वाटे झाल्यानंतर नवीन विहिरींची गरज दिवसेंदिवस भासत आहे. त्यातच आता पाणी पातळी खूप खालावल्याने विहिरींची खोलीही वाढवावी लागत आहे. अनेक शेतकरी ओढ्याजवळ किंवा पाणाड्यांकडून जागा पाहून विहीर खोदण्यास प्राधान्य देत आहे.आता पोकलेनच्या साहाय्याने विहिरी खोदल्या जात असल्याने कमी दिवसात विहिरींचे काम पूर्ण होत आहे. तरीही तळातले काम करण्यासाठी मजूर व क्रेनचाच वापर करावा लागत आहे. दरम्यान ५० ते ७० फुटापर्यंत खोल विहिरी खोदूनही पाणी लागत नसल्याने प्रत्येक नव्या व जुन्या विहिरींवर पाणी पुनर्भरण उपक्रम राबविणे गरजेचे आहे.विहिरीचे तळातले काम खूप जिकिरीचे आणि धोकादायक असून, जीव मुठीत धरून काम करावे लागते. के्रनच्या साहाय्याने मोठ मोठे दगड वर काढताना कामगारांच्या अंगावर पडण्याची भीती असते. यामुळे दक्ष राहून काम करावे लागते. ५० फूट खोल व २० फूट गोलाई असलेल्या विहिरीचे काम १ लाख ८० हजारांत उधडे घेतले जात आहे. मेहनतीच्या मानाने मोबदला मिळत नसल्याचे विहीर खोदकामगारांचे म्हणणे आहे.