शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

श्री नमोकार तीर्थावर पाषाणाचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 00:27 IST

चांदवड : राष्ट्रसंत श्री देवनंदीजी महाराज यांच्या प्रेरणेने मालसाणे येथे निर्मित श्री नमोकार तीर्थावर ४६ फूट उंच अरिहंत भगवान यांची खड्गासन स्थितीतील मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून त्यासाठी लागणारा भव्य असा ३५१ टनाचा पाषाण १६४ चाकांच्या ट्रकमधून शनिवारी (दि. ५) मालसाणे येथे दाखल झाला. तीर्थावर पाषाणाचे आगमन होताच जैन बांधवांनी वाजतगाजत आचार्यश्रींचा जयघोष करत स्वागत केले.

ठळक मुद्देमालसाणे : मंत्रोच्चरात ३५१ टनाच्या पाषाणाचे पूजन

चांदवड : राष्ट्रसंत श्री देवनंदीजी महाराज यांच्या प्रेरणेने मालसाणे येथे निर्मित श्री नमोकार तीर्थावर ४६ फूट उंच अरिहंत भगवान यांची खड्गासन स्थितीतील मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून त्यासाठी लागणारा भव्य असा ३५१ टनाचा पाषाण १६४ चाकांच्या ट्रकमधून शनिवारी (दि. ५) मालसाणे येथे दाखल झाला. तीर्थावर पाषाणाचे आगमन होताच जैन बांधवांनी वाजतगाजत आचार्यश्रींचा जयघोष करत स्वागत केले.श्री देवनंदीजी महाराज यांनी मंत्रोच्चार करत पूजाविधी केला. त्यानंतर प्रीतम शहा (पळसदेवकर), प्रकाश शेठी व विजय कासलीवाल (नांदेड) या परिवाराच्यावतीने पूजन करण्यात आले. मांगीतुंगीजी ट्रस्टचे अध्यक्ष सुमेर काला, रवींद्र पाटणी यांनी पाषाणावर पुष्पवृष्टी केली तर संतोष पेंढारी (नागपूर), तीर्थरक्षा कमिटी संजय पापडीवाल, ललित पाटणी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शैलेश कासलीवाल, पवन पाटणी, मनोज शहा, रवींद्र पहाडे, पारस लोहाडे, वर्धमान पांडे, राजेंद्र कासलीवाल, मनोज कासलीवाल, प्रवीण संचेती यांच्या हस्ते आचार्य कुंथुसागर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आचार्य श्री देवनंदीजी महाराज व नवीन नंदिजी महाराज यांचे प्रज्ञाश्रमन बहुमंडलच्या वतीने पादप्रक्षालन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे यांनी केले तर ब्रह्मचारी वैशालीदीदी यांनी आभार मानले.मान्यवरांच्या ऑनलाईन शुभेच्छायाप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, खासदार कृपाल तुमाणे, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ऑनलईन भाषणात शुभेच्छा दिल्या व नमोकार तीर्थावर भविष्यात लागणाऱ्या कार्यांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. महावीर गंगवाल, अनिल जमगे, प्रमोद कासलीवाल, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, नवीन पहाडे, विनोद लोहाडे, जयकुमार कासलीवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले . 

 

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरSocialसामाजिक