शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
2
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
3
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
4
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
5
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
6
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या
7
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
8
Crocodile Torture: वसाहतीत घुसलेल्या मगरीसोबत तरुणांचं अमानुष कृत्य, आरोपींचा शोध सुरू!
9
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
10
भारतीय पुरुषांच्या 'स्पर्म क्वालिटी'ने अभ्यासक अवाक्; रिपोर्टमधून 'जगावेगळं'च चित्र समोर
11
आशियाई हवाई हद्दीत अचानक उडताना दिसली रशियाची आण्विक फायटर जेट्स, नेमकं प्रकरण काय?
12
काही सेकंदात होतात जळून खाक, खाजगी बसला आग लागल्यावर प्रवाशांचं वाचणं का होतं कठीण?
13
अरे बापरे! कर्मचाऱ्याच्या प्रेमात वेडी झाली मालकीण; लग्नानंतर 'त्याने'च लावला कोट्यवधींचा चुना
14
मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...
15
इराणमध्ये महागाईचा कहर! हप्त्यांवर कबरीच्या दगडांची खरेदी; कारण जाणून घ्या
16
VIDEO: विराट कोहलीचा 'माईंड गेम'! आधी ट्रेव्हिस हेडशी गप्पा अन् मग पुढच्याच चेंडूवर विकेट
17
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
18
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
19
बुध गुरु युती २०२५: बुध-गुरुचा शक्तिशाली नवपंचम राजयोग; 'या' ७ राशींचा सुखाचा काळ होणार सुरु
20
हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?

शाळांमध्ये रंगला नवागतांचा स्वागत सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 01:00 IST

उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजले आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी खाऊ आणि चॉकलेट देत मुलांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला

नाशिक : उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजले आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी खाऊ आणि चॉकलेट देत मुलांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला. शाळेच्या आवारात काढलेल्या रांगोळ्या, तोरण, फुलांनी सजविलेले वर्ग आणि संगीताच्या सुरावटीने मुलांचे स्वागत करण्यात आले. शाळेत पहिले पाऊल ठेवणाऱ्या मुलांच्या पावलांचे ठसे कागदावर उमटवून शालेय जीवनातील त्यांचे पहिले पाऊल जपण्यात आले. नवागतांचा हा स्वागत सोहळा शहरात सर्वत्र रंगला होता.गुलाबपुष्पाने मुलांचे चेहरे खुलले : उन्नती प्राथमिक विद्यालयात नवागतांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले. नवीन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत शोभा रोकडे यांनी औक्षण केले. मुख्याध्यापक नंदलाल धांडे यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक कमलेश बोडके, लक्ष्मण धोत्रे, संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब सोनजे, चंदन मेखे, शालेय समिती अध्यक्ष सुभाष मुसळे, धांडे आदी उपस्थित होते. प्रमोद कोठावदे यांनी सूत्रसंचालन केले.जाजू विद्यालयराणेनगर येथील जाजू विद्यालयात नवागतांचे स्वागत व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सहचिटणीस चंद्रावती नरगुंदे, संगीता जाधव, अमोल जाधव, मुख्याध्यापक अजय पवार, मुख्याध्यापिका संगीता गजभिये यांच्या हस्ते नवागतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन गोरक्षनाथ वाणी तर आभार हरिदास चौधरी यांनी मानले.अभिनव बालविकास शाळेत स्वागतनाशिक : मविप्र संचलित अभिनव बालविकास शाळेत नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यासोबतच पाठ्यपुस्तक आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संचालक नानासाहेब महाले, शालेय समिती सदस्य डॉ. नानाजी भामरे, अर्चना सूर्यवंशी, मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी, वैशाली देवरे, शोभा गायकवाड, ज्योती पवार उपस्थित होते.शाळा व्यवस्थापन सदस्य नानाजी भामरे उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शैक्षणिक वर्षासाठी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात नानासाहेब महाले यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा संदेश दिला. मीनाक्षी गायधनी यांनी प्लास्टीक मुक्तीचा संदेश दिला. संगीत शिक्षक विलास पाटील, कांचन गोसावी, पूजा हिरे यांनी गाणी सादर केली. सूत्रसंचलन सुवर्णा गोस्वामी यांनी केले, तर ज्योती पवार यांनी आभार मानले.डे केअरचा उपक्रम पहिल्या दिवशी ‘आनंद मेळावा’इंदिरानगर : ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ संचलित डे केअर सेंटर शाळेत शाळेचा पहिला दिवस ‘आनंद मेळावा’ म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी उद्योजक प्रथमेश कोरगावकर, विशाखा भंडारी (सी.ए) उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष ल. जि. उगावकर, सचिव गोपाळ पाटील, सहसचिव अंजली पाटील, बाबा कुलकर्णी, अजय ब्रह्मेचा, अनिल भंडारी, छाया निखाडे, मुग्धा सापटणेकर, शरद गिते, माधुरी मरवट, विद्या अहिरे, पूनम सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष पूजनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी विविध खाऊच्या स्टॉलवर जाऊन खाऊचा आस्वाद घेतला. आनंदवन बालमंदिराच्या मराठी माध्यमात प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले.इयत्ता पहिली, पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. इ.१०वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी नेमाडे, मेघा जगताप यांनी केले.

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी