शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी जनआशीर्वाद यात्रेचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 22:48 IST

मालेगाव: केंद्र सरकारने काश्मीरचे ३७० कलम रद्द करून भारतात खरी लोकशाही अमलात आणल्याचे सांगून देशातील ५५ कोटी नागरिकांचे लसीकरण विनामूल्य करण्यात आले आहे. परिसरातील पाण्याचा प्रश्न आपण नक्की सोडवू, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

ठळक मुद्देसटाणा नाक्यावर स्वागत

मालेगाव: केंद्र सरकारने काश्मीरचे ३७० कलम रद्द करून भारतात खरी लोकशाही अमलात आणल्याचे सांगून देशातील ५५ कोटी नागरिकांचे लसीकरण विनामूल्य करण्यात आले आहे. परिसरातील पाण्याचा प्रश्न आपण नक्की सोडवू, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात दिंडोरी लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. भारती पवार यांचा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेचे मालेगावी जल्लोषात स्वागत करण्यात आले. पालघरपासून सुरू झालेल्या जनआशीर्वाद यात्रेचे तालुक्यातील सौंदाणे, टेहरे मार्गे मालेगावी आगमन झाले. अमेय लॉन्स येथे त्यांनी नागरिकांशी सुसंवाद साधला. त्यावेळी मंत्री डॉ. भारती पवार बोलत होत्या. जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांनी यात्रेचे प्रास्ताविक केले. खासदार सुभाष भामरे यांनी केलेल्या कामांचा आराखडा दिला. ऑप्टिकल फायबर प्रकल्प झोडगे येथे सुरू होत असून त्यात ६ हजार स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. जि.प. सदस्य समाधान हिरे यांचेही भाषण झाले.यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य लकी गिल, तालुका अध्यक्ष निलेश कचवे, दादा जाधव, जिल्हा संघटन सरचिटणीस देवा पाटील जि..प. सदस्य मनीषा पवार, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, मुकेश झुणझुणवाला, भरत पोफळे, हरिप्रसाद गुप्ता, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.मिलिंद पवार, सुधीर जाधव, सुवर्णा देसाई, सलीम पिंजारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सटाणा नाक्यावर स्वागतमालेगावी सटाणा नाका भागात केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे भाजपचे गटनेते सुनील गायकवाड, महानगरप्रमुख मदन गायकवाड, दीपक पवार, नितीन पोफळे, दीपक गायकवाड,युवा गीते, राजेंद्र शेलार, नगरसेविका सुवर्णा शेलार आदींसह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

टॅग्स :Dr Bharti Pawarडॉ. भारती पवारBJPभाजपा