शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत मंडईतील गाळेधारकांना आठवड्याचा अल्टिमेटम, दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात आक्रमक पवित्रा

By suyog.joshi | Updated: April 5, 2024 15:53 IST

रविवारपेठेतील यशवंत मंडईतील गाळेधारकांना नोटीस बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात करसंकलन विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नाशिक : रविवारपेठेतील यशवंत मंडईतील गाळेधारकांना नोटीस बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात करसंकलन विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या गाळेधारकांना आठवड्याचा अल्टिमेटम दिला आहे.दरम्यान, २०१४ पासून या गाळेधारकांकडे १ कोटीचे भाडे थकीत आहे. पालिकेने सक्त होत गाळे सील करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यापूर्वी यशवंत मंडई ही इमारत जीर्ण झाल्याने महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल समोर आल्यानंतर पालिकेने ही इमारत जमीनदोस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

परंतु, भाडेकरूंनी पालिकेविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असता न्यायालयात गाळेधारकांच्या विरोधात निकाल गेला. पुढे महापालिका प्रशासनाने या इमारतीमधील भाडेकरूंकडे असलेली १ कोटीची थकबाकी वसुलीसाठी पावले उचलली आहेत. तसेच जो कोणी पळवाट काढेल किंवा थकबाकी भरणार नाही, तर संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा चढवला जाणार आहे. या इमारतीत तेवीस गाळेधारक असून, दहा वर्षांपासून १ कोटी भाडे थकले आहे. भाडे न भरणाऱ्यांचे गाळे सील केले जाणार आहेत. दरम्यान, रविवारी कारंजा येथील यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली पार्किंग उभारण्याचे नियोजन आहे. येथे पार्किंगची जागा नसल्याने वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी लवकरच ही इमारत पाडून तेथे बहुमजली पार्किंग उभारण्याचे नियोजन आहे.गाळे रिकामे करण्याच्या सूचनाव्यावसायिकांना गाळे रिकामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी थकबाकी वसूल केली जाणार आहे. गाळेधारकांनी त्यांचे भाडे न भरल्यास गाळे सील करून त्यांच्या मालमत्तेवर थेट बोजा चढवला जाणार आहे. दरम्यान, भाडेकरूंनी महापालिकेकडे थकबाकी भरण्यासाठी पालिकेकडून मुदतवाढ देण्याची मागणी केली असता मनपाने मंगळ्वारपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक