शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठच्या आठवडे बाजारात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 01:20 IST

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना संसर्ग वाढू लागल्याने गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात घातलेल्या निर्बंधांच्या अंमलबजावणीला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करत आठवडे भाजीबाजार भरविण्यास बंदी घातली आहे. त्यानुसार बुधवारी आठवडे बाजार भरला नाही. त्यामुळे गोदाकाठी शुकशुकाट होता.

ठळक मुद्देनिर्बंधामुळे बंदी : महापालिकेने पथक केले तैनात

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना संसर्ग वाढू लागल्याने गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात घातलेल्या निर्बंधांच्या अंमलबजावणीला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करत आठवडे भाजीबाजार भरविण्यास बंदी घातली आहे. त्यानुसार बुधवारी आठवडे बाजार भरला नाही. त्यामुळे गोदाकाठी शुकशुकाट होता.भाजीपाला विक्रेत्यांनी आठवडे बाजारात बसू नये यासाठी पंचवटी मनपा प्रशासन कालपासून सज्ज झाले होते. अतिक्रमण पथकाने मंगळवारी (दि.९) सायंकाळी भाजी विक्रेते तसेच विक्रेत्यांना सूचना देत भाजीबाजार भरणार नाही असे स्पष्ट केले होते. कोरोना संसर्ग वाढल्याने व त्यातच गर्दीच्या ठिकाणी संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आठवडे बाजारावरदेखील बंदी घातली आहे. त्यामुळे बुधवारी गंगाघाटावर पंचवटी महापालिकेचे अतिक्रमण पथक तैनात करण्यात आले होते. बोटावर मोजता येतील इतक्या काही भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती, मात्र पालिकेच्या पथकाने समजूत काढून त्यांनाही उठवून दिले.एरवी विविध विक्रेते, भाजीपाला विक्रेते व ग्राहकांच्या वर्दळीने फुलणारा आठवडे भाजीबाजार पूर्णपणे ओस पडल्याचे चित्र होते. काही महिन्यांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्याने भाजीबाजार पूर्ववत सुरू झाला होता, मात्र भाजीबाजारात येणारे ग्राहक, विक्रेते नियमांचे उघडपणे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत होते..लाखो रुपयांची उलाढाल ठप्पगंगाघाटावर दर बुधवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात नाशिक शहर तसेच ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने ग्राहक व विक्रेते येत असतात. विविध वस्तू खरेदी-विक्रीच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. करुणा संसर्ग वाढल्याने बुधवारी आठवडे बाजार भरला असल्याने लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या