शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीच्या पुरामुळे बुधवारचा बाजार ठप्प

By श्याम बागुल | Updated: August 22, 2018 18:05 IST

गेल्या तीन दिवसांपासून गोदावरीला पूर कायम असून, रामकुंड, म्हसोबा महाराज तसेच गौरी पटांगणाला पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे गंगाघाट परिसरात आठवडे बाजारात बसण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. केवळ बोटावर मोजण्याइतके व्यावसायिकच दाटीवाटीने नारोशंकर मंदिरासमोर तसेच रामसेतू पुलावरच

ठळक मुद्दे विक्रेत्यांनाही रस्त्यावर ठाण मांडावे लागले.लाखो रुपयांची उलाढाल ठप्प

नाशिक : शहर व परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातून गोदावरी नदीला पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीच्या पुरामुळे दर बुधवारी भरणारा गंगाघाटावरचा आठवडे बाजार पूर्णपणे ठप्प झाला.गेल्या तीन दिवसांपासून गोदावरीला पूर कायम असून, रामकुंड, म्हसोबा महाराज तसेच गौरी पटांगणाला पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे गंगाघाट परिसरात आठवडे बाजारात बसण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. केवळ बोटावर मोजण्याइतके व्यावसायिकच दाटीवाटीने नारोशंकर मंदिरासमोर तसेच रामसेतू पुलावरच काही भाजी विक्रेत्यांनी दुकान थाटले होते. पुराच्या पाण्याने गंगाघाटावरील जुन्या भाजीबाजारातही शिरकाव केल्याने तेथील विक्रेत्यांनाही रस्त्यावर ठाण मांडावे लागले. बुधवारचा आठवडे बाजार विस्कळीत झाल्याने अंदाजे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. म्हसोबा महाराज, गौरी पटांगणावर पाण्याचे साम्राज्य असल्याने भाजीपाला व विविध व्यावसायिकांनी गणेशवाडी, आयुर्वेद महाविद्यालय, गणेशवाडी देवीमंदिरपर्यंत रस्त्यावर दुपारनंतर भाजीबाजार मांडला होता.बुधवारी सकाळनंतर पावसाने उघडीप दिली असली तरी, रामकुंडावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे विविध धार्मिक विधी करण्यासाठी आलेल्या स्थानिक तसेच परगावच्या भाविकांना नदीकाठावरच धार्मिक विधी उरकते घ्यावे लागले. दुपारी गंगाघाटावरील दुतोंड्या मारुती मूर्तीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी लागल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तर रामकुंडाशेजारी असलेले मनपा वाहनतळही पाण्याखाली गेल्याने देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना गंगाघाट परिसरात मिळेल त्या ठिकाणी दुचाकी तसेच चारचाकी वाहने उभ्या कराव्या लागल्याचे चित्र दिसून आले.

 

टॅग्स :floodपूरNashikनाशिक