शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

विणकर चिंतित : रेशमाचे भाव वाढले; पैठणीचे दर घसरले

By admin | Updated: July 25, 2016 23:20 IST

महाराष्ट्राचे राजवस्त्र पैठणीला उतरती कळा

दत्ता महाले : येवलाशहराची आर्थिक बाजारपेठ अवलंबून असणाऱ्या पैठणीला सध्या उतरती कळा लागली असून, ऐन दुष्काळात तेरावा महिना म्हणून गेल्या सहा ते सात महिन्यात रेशमाचे भाव १००० ते १२०० रु पयाने वाढले आहेत. परिणामी सिंगल व डबल पदर रेशमी पैठणीचे भाव १००० रुपयांनी घसरल्याने विणकरांची चिंता वाढली आहे.शेतकऱ्यांच्या कांद्याला अडतीचा दांडू अडवा आला आणि कांद्याचा वांधा झाला. शेतकरी अडचणीत आले तशीच परिस्थिती येवल्याच्या पैठणीबाबतही सध्या झाली आहे. शहराची मुख्य बाजारपेठ ही कांदा व पैठणीवर अवलंबून आहे. कांद्यासह पैठणीला घसरण सुरू झाल्याने आता शहराच्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम जाणवत आहे. बाजारपेठ मंदावली आहे. जानेवारी महिन्यामध्ये अडवाण रेशमाचे भाव २३०० रुपये किलो होते, तर उभार रेशीम २८०० रुपये किलो होते. त्यादरम्यान सिंगल पदरी पैठणीला ५००० रुपये भाव मिळत होता, तर डबल पदराला ५५०० रुपये भाव होता. वर्षाची सुरुवात चांगली झाली होती. घरी एक अथवा दोन हातमाग असणाऱ्यांचे बरे चालले होते. परंतु गेल्या सहा महिन्यात येवल्याच्या पैठणीला उतरती कळा लागली असल्याचे विणकरांचे म्हणणे आहे. जुलै महिन्यात अडवाण रेशमाचे भाव ३५०० रुपये प्रतिकिलो झाले, तर उभार रेशीम ३७०० रुपये प्रतिकिलो एवढे वाढले होते. आणि सध्या पैठणीच्या विक्री किमतीला घसरण लागली असून, सिंगल पदरी पैठणीला ४३०० रुपये भाव मिळत असून, डबल पदरी पैठणीला ४८०० रुपये भाव मिळत आहे. पैठणीवरील मंदीचे सावट नेमके नैसर्गिक, की कृत्रिम याबाबत कारागीर चर्चा करीत आहेत. सिंगल पदर पैठणी तयार करण्यासाठी किमान पाच ते सहा दिवस लागतात. परंतु सध्या आठवडाभर काम करूनही केवळ ५०० ते ६०० रुपये पदरी पडत असल्याने विणकर मंदीच्या सावटामुळे निराश झाले आहेत. भाव घसरल्याने कामाचा वेगदेखील कमी झाला आहे. विणकर सरासरी दिवसाला ८ ते १० तास काम करतो; मात्र पैठणीच्या भावातील घसरणीमुळे काम करूनही पैसा दिसत नसल्याने दिवसभरात चार ते पाच तास काम विणकर करत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या मालाला उठाव नसल्याने पैठणी विणकरांकडून खरेदी करणेदेखील व्यापाऱ्यांनी कमी केले आहे. एक अथवा दोन हातमाग असणारे विणकर व पन्नास ते शंभर पैठणीचे नग सांभाळण्याची क्षमता नसलेल्या विणकरांना या मंदीचा फटका मोठ्या प्रमाणवर बसत आहे. पुणे, मुंबई शहरात व्यापाऱ्यांना पैठणी विकली तर भाव मिळतो. परंतु दोन चार पैठणीचे नग विक्रीसाठी जाणे सर्वसामान्य विणकराला परवडत नाही त्यामुळे तयार नग हे गावातच कमी भावात विकण्याशिवाय पर्याय नाही.