शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरवैद्यला महिलांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:09 IST

एकीकडे संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले असून, येथील नागरिक कोरोनासारख्या रोगापासून वाचण्यासाठी घरातच बसून आहेत. परंतु नांदूरवैद्य येथील ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचे कुठलेही नियोजन न करता नवीन विहिरीच्या खोदकामास सुरु वात केली आहे. यामुळे महिलांना कोरोनाची भीती न बाळगता पायपीट करून दूरवरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देगैरसोय : पूर्वनियोजन न करताच विहिरीच्या खोदाईस प्रारंभ

नांदूरवैद्य : एकीकडे संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले असून, येथील नागरिक कोरोनासारख्या रोगापासून वाचण्यासाठी घरातच बसून आहेत. परंतु नांदूरवैद्य येथील ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचे कुठलेही नियोजन न करता नवीन विहिरीच्या खोदकामास सुरु वात केली आहे. यामुळे महिलांना कोरोनाची भीती न बाळगता पायपीट करून दूरवरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार देशभरात संचारबंदी लागू झाली असून, जमावबंदीदेखील लागू आहे. याच पार्श्वभूमीवर नांदूरवैद्य येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागत असल्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होऊ शकते. यासाठी नांदूरवैद्य येथील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याचे नियोजन नवीन विहिरीचे खोदकाम करण्याआधी करायला पाहिजे होते. मात्र, उपाययोजना न करता नवीन विहिरीच्या खोदकामास सुरु वात केली असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.सध्याच्या परिस्थितीत दारणा नदीतून मुख्य पाइपलाइनला पाइप जोडून वापरासाठी पाणी येणार होते. परंतु त्यास विलंब होत असल्यामुळे अजून किती दिवस पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागणार, असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. सध्या दारणा नदीकाठच्या जागेत नवीन विहिरीचे काम सुरू असून, या कामाला बरेच दिवस लागणार असल्यामुळे ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे पायपीट करून पाणी आणण्यापासून दिलासा मिळेल तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर जाण्याची वेळी आणू नये, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातcorona virusकोरोना वायरस बातम्या