शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
12
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
13
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
14
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
15
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

निवडणूकीच्या काळात २८५ लोकांचे शस्त्रे होणार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 15:04 IST

शहरात कोठेही कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्थेला धोका निर्माण होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाक डून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहे.

ठळक मुद्देसराईत ९३ गुन्हेगार शहर-जिल्ह्यातून तडीपार सुरक्षेच्या दृष्टीने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार

नाशिक : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये तयार करण्यात आलेल्या समितीच्या निर्देशानुसार शहरातील सुमारे २८५ परवानाधारक शस्त्रे जप्त करण्यात येणार आहे. शहरात एकूण १ हजार २५० व्यक्तींकडे परवाना असलेली शस्त्रे असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.निवडणूकीची आचारसंहिता लागू झालेली असून पोलीस प्रशासनाने लोकसभा निवडणूकीपासूनच विधानसभा निवडणूकीच्या बंदोबस्ताची तयारी केली आहे. शहरात कोठेही कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्थेला धोका निर्माण होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाक डून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या यादीवरील सराईत गुन्हेगारांची चाचपणी केली जात आहे. आतापर्यंत उपद्रवी संशयित एक हजारांपेक्षा अधिक लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच सराईत गुन्हेगारांपैकी ९३ गुन्हेगारांना शहरास जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. ९ संशयितांवर झोपडपट्टी दादा कायद्यान्वये गुन्हे दाखल क रण्यात आले आहेत. विधानसभा निवडणूक नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून तर थेट निकालाच्या दिवसापर्यंतचा शहरातील सर्व मतदान केंद्रे, पाच स्ट्रॉँग रूम, संवेदनशील मतदान केंद्रे, प्रचारफेऱ्या, प्रचार सभा याबाबत चोख बंदोबस्त व सुरक्षेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार असल्याचे नांगरे पाटील म्हणाले.निवडणूक काळात कुठल्याहीप्रकारे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तुर्तास २८५ परवानाधारक व्यक्तींचे शस्त्रे जप्त करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत, त्या निर्देशानुसार शस्त्रे जप्तीची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. गरज वाटल्यास उर्वरित एक हजार लोकांमधूनदेखील शस्त्रे जप्त केली जाऊ शकतात. बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्यांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक