शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

आम्ही पैसे देतो, तुम्ही शेतकऱ्यांना रोहित्र द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 00:56 IST

जिल्ह्यात विजेचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांना रात्री बे रात्री वीज मिळते. इतकेच नव्हे तर एखाद्या विभागाचे रोहित्र जळाले तर महिना महिना बदलून मिळत नाही. त्यासाठी शेतकºयांनाच पुढाकार घ्यावा लागतो. जिल्ह्यात अनेक रोहित्र बंद असल्याने शेतकºयांची गैरसोय होत आहे. बंद पडलेले सर्व रोहित्र बदलण्यासाठी प्रसंगी आम्ही आमचा निधी देऊ, पण तुम्ही शेतकºयांना तत्काळ रोहित्र बदलून द्या अशा सूचना जिल्ह्यातील आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना केल्या.

ठळक मुद्देआमदारांचा सूर । नियोजन बैठकीत विजेच्या प्रश्नावर जोरदार चर्चा

नाशिक : जिल्ह्यात विजेचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांना रात्री बे रात्री वीज मिळते. इतकेच नव्हे तर एखाद्या विभागाचे रोहित्र जळाले तर महिना महिना बदलून मिळत नाही. त्यासाठी शेतकºयांनाच पुढाकार घ्यावा लागतो. जिल्ह्यात अनेक रोहित्र बंद असल्याने शेतकºयांची गैरसोय होत आहे. बंद पडलेले सर्व रोहित्र बदलण्यासाठी प्रसंगी आम्ही आमचा निधी देऊ, पण तुम्ही शेतकºयांना तत्काळ रोहित्र बदलून द्या अशा सूचना जिल्ह्यातील आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना केल्या. बैठकीचे अध्यक्ष पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही अधिकाºयांनी तत्काळ प्रस्ताव दिल्यास त्यांना शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. बैठकीत विजेच्या प्रश्नावर जिल्ह्यातील आमदार आक्रमक झाले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज वितरण कंपणीची रोहित्र बंद आहेत. रोहित्र बदलून देण्यास अधिकाºयांकडून टाळाटाळ केली जाते. यामुळे शेतकºयांची गैरसोय होते. अनेकवेळा शेतकरी स्वत:च पुढाकार घेऊन रोहित्र दुरुस्त करून घेतात. अशा विविध तक्रारी आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, नरहरी झिरवाळ आदींनी केल्या. जिल्ह्णात एकूण किती रोहित्र बंद पडली आहेत. ती सर्व बदलविण्यासाठी किती निधी लागेल? असे प्रश्न भुजबळ यांनी अधिकाºयांना विचारले, मात्र वीज वितरणच्या अधिकाºयांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.आमदार काय म्हणाले..४रोहित्रांच्या प्रकरणात फायदा असल्याने अधिकारी त्यासाठी महिना महिना वाट पाहायला लावतात - नितीन पवार४रोहित्र जळाल्यास मालेगावी पॉवरलूक कारखाने अनेक दिवस बंद राहतात. त्याचा मजुरांना फटका बसतो. - मौलाना मुफ्ती मोहमद४जळालेले रोहित्र २४ तासात बदलून द्यावे, असा नियम असताना शेतकºयांना ते महिना महिना मिळत नाही. - माणिकराव कोकाटे४नवीन रोहित्र घेण्यासाठी निधी नसेल तर प्रसंगी आमदारांचा निधी वापरावा - हिरामण खोसकरमाजी पालकमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका४जिल्ह्यातील विकास निधीवर २०-२५ टक्के खर्च होणे बाकी राहिल्यास आम्ही त्याकाळी प्रशासनाला जाब विचारत होतो. आता तर केवळ २० टक्के निधी खर्च होऊन ८० टक्के निधी पडून राहत असतानाही तेव्हा लोकप्रतिनिधीही काहीच कसे बोलले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित करीत मागील शासनाच्या कार्यकाळातील लोकप्रनिधी आणि पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरही अप्रत्यक्ष टीका केली. नाशिकमधील २० हजार कोटींच्या मेट्रो प्रकल्पाविषयी भुजबळ यांना विचारले असता याविषयीची पूर्ण माहिती आपल्याकडे आली नसून याची माहिती घेतली जाईल असे सांगून ‘सारे आभाळच फाटलंय’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.ई-गव्हर्नस काय कामाचे४शासकीय कामात गतिमानता यावी यासाठी ई-गव्हर्नस प्रणाली कार्यरत असताना अधिकारी या सुविधांचा वापर करीत नाहीत का, असा सवाल पालकमंत्री भुजबळ यांनी उपस्थितीत केला. अधिकाºयांच्या हातात ई-मेल, व्हॉट्््सअ‍ॅपसारखे माध्यमे असताना कामांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि संबंधित अधिकारी, विभागाला संदेश पाठवून कामांची आठवण करून देण्यास काय हरकत आहे. अधिकाºयांच्या अशा निष्काळजीपणामुळेच जिल्ह्याचे अपयश समोर आले असल्याची हतबलता भुजबळ यांनी व्यक्त केली. दरम्यान येत्या २८ रोजी आढावा घेण्यासाठी पुन्हा एकदा जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली जाईल, असे जाहीर केले.भुजबळांनी जोडले हातआदिवासी उपायोजनेतील कामांच्या खर्चाचा तपशील का सादर केला नाही, अशी विचारणा जिल्हा परिषदेच्या एका अभियंत्यांना विचारला असता त्यांना खर्चाच्या तपशिलाविषयी काहीच सांगता आले नाही. वारंवार विचारणा करूनही मूळ मुद्दा सोडून ते माहिती देऊ लागल्याने अखेर पालकमंत्री छगन भुजबळांवर ‘हात जोडून विनंती करतो, कामे करा’ असे हताशपणे म्हणण्याची वेळ आली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी