शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
5
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
6
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
7
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
8
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
9
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
10
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
11
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
12
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
13
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
14
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
15
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
16
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
17
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
18
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
19
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे, चिखलातून काढावा लागतो मार्ग

By admin | Updated: August 3, 2014 01:58 IST

खड्डे, चिखलातून काढावा लागतो मार्ग

 

नाशिक : रस्त्यांवर ठिकठिकाणी झालेले खड्ड्यांचे साम्राज्य, चिखलमय रस्ते, बंद पथदीप, तुंबलेल्या गटारी आणि कुजलेला कचरा ही समस्या आहे प्रभाग क्र मांक ६ मधील विविध परिसराचे. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून, प्रभागाचे लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने समस्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील स्वामी विवेकानंदनगर, अश्वमेधनगर, कर्णानगर, पवार मळा, गजवक्रनगर आदि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सदर परिसरातील बहुसंख्य अंतर्गत रस्त्यांचे अद्यापही डांबरीकरण वा कॉँक्रिटीकरण झालेले नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे तयार होतात. आहे त्या रस्त्यांवर मुरूम नसल्यामुळे खड्ड्यांची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे आणि चिखल यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. डांबरीकरण वा कॉँक्रिटीकरण होईल तेव्हा होईल; मात्र सद्यस्थितीत पालिकेने अशा रस्त्यांवर मुरूम तरी टाकायला हवा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. परिसरातील अनेक रस्त्यांवर केवळ विजेचे खांब उभे करण्यात आले आहेत; मात्र त्यांना दिवे न बसविल्याने परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. आहे तेथील पथदीपही नेहमीच बंद असल्याचे नागरिकांनी सांगितले. नियमित साफसफाई होत नसल्याने परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पावसामुळे कचरा कुजला असून, दुर्गंधी सुटल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गटारींचे चेंबरही तुंबल्याने रस्त्यांवर दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रभागाच्या लोकप्रतिनिधींनी काही ठरावीक परिसराचाच विकास केला असून, काही भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. (प्रतिनिधी)