शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘ड्रॅगन’विरोधात संतापाची लाट : चिनी उत्पादनांकडे ग्राहकांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 21:30 IST

पावसाचे आगमन होताच शहरात रेनकोट आणि रंगीबेरंगी छत्र्यांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. परंतु टाळेबंदीमुळे तब्बल तीन महिने व्यवसाय ठप्प असल्याने बाजारात आता या वस्तूंच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा स्थितीत चिनी वस्तू काही प्रमाणात स्वस्त मिळत असल्या तरी सध्या भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी यंदा चिनी वस्तूंकडे पाठ फिरवली आहे. 

ठळक मुद्देचीन विरोधात नाशिककरांमध्ये संतापाची लाटचिनी उत्पादनांवर ग्राहकांचाही बहिष्कार

नाशिक: पावसाचे आगमन होताच शहरात रेनकोट आणि रंगीबेरंगी छत्र्यांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. परंतु टाळेबंदीमुळे तब्बल तीन महिने व्यवसाय ठप्प असल्याने बाजारात आता या वस्तूंच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा स्थितीत चिनी वस्तू काही प्रमाणात स्वस्त मिळत असल्या तरी सध्या भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी यंदा चिनी वस्तूंकडे पाठ फिरवली असून चिनी वस्तूंऐवजी ग्राहकांकडून स्वदेशी वस्तूंना मागणी होत असल्याचे दिसून येत आहे. नाशकात यंदा पावसाचे दणक्यात आगमन झाल्याने नाशिककर सुखावले आहेत. मात्र सध्या कोरोनाच्या संकाटामुळे बाजारपेठेवर गेल्या काही दिवसांपासून निर्बंध असल्याने अनेक नाशिकरांनी पावसाळ्यात लागणाऱ्या छत्री, रेनकोटसारख्या वस्तूंची खरेदी केलेली नव्हती. मात्र आता सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे बहुतांश दुकाने आता सुरू झाली असून, नोकरदार आणि सर्वच वर्गाकडून छत्री आणि रेनकोटच्या दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा छत्री व रेनकोटचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. काही दुकानदारांनी करोना काळातील दुकाने बंद असल्याचा फायदा घेत दरात वाढ केली आहे. छत्री अथवा रेनकोटवर छापलेली किंमत नसते. त्यावर केवळ किमतीचे स्टिकर लावण्यात येते. अनेक दुकानदारांनी झालेला तोटा भरून काढण्यासाठी किमती वाढवत आहेत. मार्केटमध्ये प्रिंटेड, फोल्डिंग, आर्मी सिल्वर, रेम्बो छत्री, मल्टिकलर, आर्मी सिल्व्हर, फॅमिली पॅक व गार्डन छत्री, ट्रान्सपरेंट, पॉकेट छत्री, हॅट अम्ब्रेला, मुलांसाठी कार्टून कॅरेक्टर व फ्लोरोसेंट रंगाच्या छत्र्यांचा साठा आलेला आहे. यंदाही या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर होण्याची अपेक्षा असल्याने नवीन प्रकारच्या वस्तूही दाखल झाल्या आहेत. परंतु, यातील चीन उत्पादनांकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. भारत-चीन सीमेवरील गवलान खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण भारतभरातून चीनविरोधात संताप उफाळून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नाशिककरांमध्ये चीनच्या या कृत्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, ग्राहकांनीही चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्याचे दिसून येत आहे. दरम्यान,  अनेक भारतीय नागरिक चिनी वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे चीनला आर्थिकबळ मिळत आहे. परंतु चीनकडून या बळाचा वापर भारताविरोधात होणार असेल तर प्रत्येक भारतीय नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालायला हवा अशी प्रतिक्रिया काही ग्राहकांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :border disputeसीमा वादNashikनाशिकMarketबाजारRainपाऊसBorderसीमारेषा