शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीला पाणवेलींचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:17 IST

ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली असतानाच गोदावरी नदीच्या पात्रात पाणवेली पसरल्याने पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोदावरी नदीपात्र पाणवेलींमध्ये गडप झाले असून, पाणवेलींचे क्षार पाण्यात मिसळत असल्याने पाण्याला बेरंग आला आहे.

सायखेडा : ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली असतानाच गोदावरी नदीच्या पात्रात पाणवेली पसरल्याने पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोदावरी नदीपात्र पाणवेलींमध्ये गडप झाले असून, पाणवेलींचे क्षार पाण्यात मिसळत असल्याने पाण्याला बेरंग आला आहे.  गोदाकाठ भागातील अनेक गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा सायखेडा परिसरातून होत आहे. कूपनलिकेच्या अनेक विहिरी आणि पाइपलाइन या परिसरातून असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. खराब पाण्यामुळे साथीचे रोग पसरून विविध रोगांना आमंत्रण दिले जात आहे. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यामुळे पश्चिमेला सायखेडा, चाटोरीपर्यंत थोप असल्याने या भागात पाण्याला संथ प्रवाह असतो. त्यामुळे पाण्याबरोबर वाहत आलेल्या पाणवेली अनेक ठिकाणी अडकून आहे. त्यामुळे पाणी दूषित होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाणी हिरवेगार, परिसरात डास, अस्वच्छता, दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने ग्रामस्थांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. दूषित पाण्यामुळे साथींच्या आजारांना आमंत्रण दिले जात आहे. नदीपात्रातील पाण्याला बेरंग आला असून, बहुतेक गावांत नदीपात्रातून थेट उपसा करून पाणीपुरवठा केला जात असल्याने, हिरवा रंग, दर्पवास, जंतुसद्श दूषित पाणीपुरवठा होतो. उन्हाची तीव्रता वाढल्याने ग्रामस्थ पाणी विकत घेऊन, आपली तहान भागवत आहेत. यात ग्रामस्थांचे हाल होत असून, ग्रामस्थांबरोबरच जलचर प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर पाणवेली काढून टाकाव्यात, अशी मागणी होत आहे.निफाड तालुक्याच्या दक्षिणेकडील अनेक गावांना पिण्यासाठी गोदावरी नदीच्या तीरावरून कूपनलिकेतून पाणीपुरवठा केला जातो. नदीलगतच्या सर्व गावांना पाणीपुरवठा होत असतो. नदीवर पसरलेल्या पाणवेलींमुळे अनेक साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याने तातडीने पाणवेली काढाव्यात.- गोकुळ गिते, पिंपळगाव

टॅग्स :godavariगोदावरीriverनदी