शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभ धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:15 IST

सटाणा : शहराला तब्बल ४१ वर्षांपासून पाणीपुरवठा करणारा जलकुंभ धोकादायक बनला असून, केव्हाही कोसळण्याची भीती संरचना परीक्षण (स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट) अहवालात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या एक वर्षापासून हा अहवाल प्राप्त होऊनही भर रस्त्यावर असलेल्या या धोकादायक जलकुंभाबाबत कोणत्याही उपाययोजना न केल्याने पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

ठळक मुद्देसटाणा पालिकेचा भोंगळ कारभार वर्षभरापूर्वी अहवाल मिळूनही दुर्लक्ष

सटाणा : शहराला तब्बल ४१ वर्षांपासून पाणीपुरवठा करणारा जलकुंभ धोकादायक बनला असून, केव्हाही कोसळण्याची भीती संरचना परीक्षण (स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट) अहवालात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या एक वर्षापासून हा अहवाल प्राप्त होऊनही भर रस्त्यावर असलेल्या या धोकादायक जलकुंभाबाबत कोणत्याही उपाययोजना न केल्याने पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.येथील पालिकेच्या अखत्यारितील मुख्य प्रशासकीय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर, पंडित धर्माजी पाटील जलकुंभ, तुकाराम गणपत सोनवणे जलकुंभ यांचे गेल्या वर्षी संरचना परीक्षण करण्यात आले. गेल्या १४ जून २०१७ रोजी प्राप्त झालेल्या या संरचना परीक्षण अहवालात ताहाराबाद रस्त्यावरील पंडित धर्माजी पाटील जलकुंभ गळका व पडका झाल्याचे स्पष्ट केले आहे. असे असताना जलकुंभाच्या आजूबाजूला असलेल्या व्यापारी व शालेय प्रशासनाने वेळोवेळी गळका जलकुंभ दुरुस्त करण्याची मागणी केली होती.मात्र अनेकवेळा मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्टची माहितीचा अधिकार वापरून मागणी केली होती. या आॅडिटमध्ये खळबळजनक माहिती उघडकीस आली. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १९७६ मध्ये आरसीसी बांधकाम असलेला सुमारे ७ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला.तांत्रिकदृष्ट्या या जलकुंभाचे दर पंधरा वर्षांनी स्ट्रक्चरल आॅडिट करून आवश्यक सूचनेनुसार दुरुस्ती करून घेणे आवश्यक असते; मात्र पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वेळोवेळी देखभाल दुरु स्ती न झाल्यामुळे हा जलकुंभ गळका आणि पडका झाला आहे. दरम्यान भर रस्त्यावरील आणि आजूबाजूला व्यापारी संकुल, शाळा असून, या धोकादायक जलकुंभामुळे मालमत्ता तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असताना कोणत्याही उपाययोजना न केल्याने पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.काय आहे अहवालातपंडित धर्माजी पाटील जलकुंभाचा स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट १४ जून २०१७ ला पालिका प्रशासनाला प्राप्त झाला. या रिपोर्टमध्ये जलकुंभाच्या ९ कॉलम पैकी २ कॉलमचे सीमेंट कॉँक्र ीट निघालेले असून आतील गज गंजलेल्या अवस्थेत आहेत. जलकुंभाच्या उभ्या भिंतींना मोठमोठे तडे जाऊन गज गंजून खराब झाल्यामुळे पाण्याची गळती सुरू आहे, जलकुंभाचे तळाचे छत व जलकुंभाच्या पायऱ्या यांचे लोखंडी गज उघडे पडून गंजून खराब झाले आहेत. एकंदरीत या आॅडिटमध्ये हा जलकुंभ पूर्ण क्षमतेनुसार कार्यरत नसून तो भविष्यात केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे, असे नमूद करण्यात आले आहे. हा रिपोर्ट नाशिकच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या अभियंत्यांनी दिला आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी