शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 01:44 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात होणाºया पाणीगळती व पाणीचोरीविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचे आदेश देतानाच ज्या भागात प्रमाणापेक्षा जास्त पाणीपुरवठा होतो, तेथे पाणीकपातीचे संकेत दिले आहेत.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात होणाºया पाणीगळती व पाणीचोरीविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचे आदेश देतानाच ज्या भागात प्रमाणापेक्षा जास्त पाणीपुरवठा होतो, तेथे पाणीकपातीचे संकेत दिले आहेत. त्यानुसार, पाणीपुरवठा विभागामार्फत अनधिकृत नळजोडणीधारकांविरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे. याशिवाय शहरातील झोपडपट्टी भागातील स्टॅण्डपोस्टही बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, यापुढे झोपडीधारकांना पाण्याचे पैसे मोजावे लागणार आहेत.  नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात सद्यस्थितीत ७४ टक्के पाणीसाठा आहे तर काश्यपी धरणात ९४ टक्के, गौतमी गोदावरीत ४० टक्के, आळंदीत ६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरण समूहात एकूण ७१ टक्के पाणीसाठा आहे. याशिवाय दारणा धरणात ६८ टक्के पाणीसाठा आहे. यंदा शहराला ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका मुबलक पाणीसाठा असला तरी, उन्हाळ्यात पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता पालिकेने काही उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यात महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या घेतलेल्या आढाव्यात पाणीगळतीवर प्राधान्याने गांभीर्याने चर्चा झाल्याचे समजते. त्यानुसार आयुक्तांनी पाणीगळती रोखण्यासाठी प्रभावी व कठोर उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यातूनच अनधिकृत नळजोडणीधारकांविरुद्ध महापालिकेने मोहीमच सुरू केली असून, अशा नळजोडण्या खंडित करण्याबरोबरच संबंधितांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. या कारवाईबरोबरच प्रशासनाकडून येत्या काळात पाणीकपातीचेही संकेत मिळत आहेत.पाण्याचा अपव्यय रोखणारशहरात काही भागात एक वेळ तर काही भागात दोन वेळचा पाणीपुरवठा केला जात आहे. महापालिकेने केलेल्या वॉटर आॅडिटमध्ये १४.५० पाणीगळती आढळून आली असून, ४४.५० टक्के हिशेबबाह्य पाणी असल्याचे निदर्शनास आले आहे. ही तूट भरून काढण्यासाठीही महापालिकेमार्फत कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. शहरात काही भागात मीटर नसल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असतो. हा अपव्यय थांबविण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिल्याचे समजते. स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट मिटरिंग सिस्टम कार्यान्वित करण्याचे नियोजन असून, कंपनीकडूनही त्याबाबत नियोजन केले जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी