शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

‘जलयुक्त’ गावांमध्ये पाणी कुठे मुरले?

By admin | Updated: May 1, 2017 01:10 IST

जलयुक्तची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेली असताना संबंधीत गावांमध्येच टॅँकर सुरू करण्याची वेळ आल्याने त्यावरील २०० कोटींच्या खर्चाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

 श्याम बागुल  नाशिकराज्य शासनाने राबविलेल्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेली असताना संबंधीत गावांमध्येच पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर टॅँकर सुरू करण्याची वेळ आल्याने ही कामे व त्यावरील सुमारे २०० कोटींच्या खर्चाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे जलयुक्त शिवार योजनेमुळे भुगर्भातील पाण्याची पातळी वाढली असे एकीकडे छातीठोकपणे सांगितले जात असताना प्रत्यक्षात त्याही बाबतीतली बनवेगिरी शासकीय आकडेवारीनेच उघड झाली आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेबाबत जिल्हा प्रशासनाने केलेले दावे किती आभासी आहेत, याचा प्रत्यय येऊन गेला आहे. ‘पावसाचे पाणीच जमिनीत मुरते’ हे भूजलतज्ज्ञांचे सर्वमान्य शास्त्र असताना सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २२९ गावांमध्ये करण्यात आलेल्या ८१०० विविध कामांमुळेच पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचा दावा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केला आहे. परंतु काही ‘जलयुक्त’ गावांमध्येच चक्क टॅँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याने या योजनेवरील सुमारे २०० कोटी रुपयांच्या खर्चाबाबत नेमके पाणी कुठे मुरले, हा संशोधनाचा भाग बनला आहे. गेल्या वर्षी जुन ते सप्टेंबर या तीन महिन्यांत जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १०२ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर भूजल पातळीत सरासरी पाच ते सहा फुटांपर्यंत वाढ अपेक्षितच धरली जात असल्याचे भुजल सर्व्हेक्षण विभागाचे म्हणणे आहे. यात जलयुक्तची भर पडत्यामुळे भुगर्भातील पाणी साठ्यात वाढ होऊन संबंधित गावांतील पाणीटंचाई कमी झाल्याच्या तसेच शेती शिवार फुलल्याच्या यशोगाथा कानी पडायला हव्यात. परंतु, १४ गावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामे होऊनही प्रशासनावर तेथे टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवली आहे. मालेगाव तालुक्यात एक मिली मीटरही विहिरींच्या पाणी साठ्यात वाढ झाली नसल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यातील २२९ गावांमध्ये करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील ८१०० विविध प्रकारच्या कामांवर विविध यंत्रणांनी एकाच वर्षात तब्बल १८० कोटी ७० लाख रुपये खर्च केले आहेत. पण टँकरमुक्ती होऊ शकली नाही़एप्रिलअखेर जिल्ह्यात काही गावांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वाढता उष्मा आणि धरणातील कमी होत चाललेला पाणीसाठा पाहता मे आणि जून महिन्यांत परिस्थितीत आणखी बदल होऊन टॅँकरची संख्या वाढू शकते. कदाचित जलयुक्त गावांनाही टॅँकरने पाणीपुरवठ्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे यंदा जलयुक्त गावांमध्ये एकही टॅँकर सुरू होऊ शकला नसल्याचा दावा तकलादू आणि शासनाचीच दिशाभूल करणारा ठरला आहे़प्रशासनाची ‘अशीही’ बनवाबनवीजिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २०१६-१७ मध्ये २१८ गावांमध्ये ४३३३ इतकी कामे करण्यात येणार असून, त्यापैकी ३३२७ इतकी कामे पुर्ण झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे. विशेष म्हणजे जलयुक्त शिवार योजनेची कामे केलेल्या गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा न करण्याची भूमिका घेणाऱ्या प्रशासनाने जलयुक्तची कामे झालेल्या गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी यंदा कोट्यवधीची तरतूद कायम ठेवली आहे तसेच टंचाई आराखड्यात जलयुक्तची कामे झालेल्या गावांचाही समावेश करण्याची बनवेगिरीही केली आहे.