शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वडाळ्यात दूषित पाणीपुरवठा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:14 IST

वडाळागाव परिसरात साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविताना आरोग्य विभागाची दमछाक होत असताना पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजी कारभार सुरूच असल्याने आता नागरिकांना दूषित पिण्याच्या पाण्यावाटे पसरणाऱ्या आजारांचा धोका उद्भवला आहे.

नाशिक : वडाळागाव परिसरात साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविताना आरोग्य विभागाची दमछाक होत असताना पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजी कारभार सुरूच असल्याने आता नागरिकांना दूषित पिण्याच्या पाण्यावाटे पसरणाऱ्या आजारांचा धोका उद्भवला आहे. पाणीपुरवठा विभागाने गलथान कारभाराचा कळस गाठला असून आठवडाभरापासून नागरिकांच्या घरात नळांवाटे पिवळसर पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.  वडाळागाव परिसरात अद्यापही काही भागांमध्ये सांधेदुखी, थंडी-ताप, विषमज्वरसारख्या आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. अशा परिस्थितीत वडाळागावात पाणीपुरवठा शुद्ध स्वरूपाचा होणे अपेक्षित असताना अधूनमधून नळांना पाणी गढूळ, पिवळसर येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वडाळागावात शुद्ध पाणीपुरवठा केला जावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. वडाळागाव परिसरातील नागरिकांना पोटदूखी, जुलाब, अतिसारसारख्या शारीरिक तक्रारींचाही सामना करावा लागत आहे. यामुळे दिवसेंदिवस वडाळागाव परिसरातील रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. वारंवार मागणी करूनदेखील वडाळागावात नियमित स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याने जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.  वडाळागावातील गढूळ पाणीपुरवठ्याच्या समस्येवर उपाययोजना करण्यास पाणीपुरवठा विभागाला अद्याप यश आलेले नाही. दोन दिवसांआड वडाळागावात अशुद्ध पाणी नळांना येत असल्याचे महिलांनी सांगितले. ही समस्या गावातील एका विशिष्ट परिसराची नसून संपूर्ण गावात पिवळसर पाणी येऊ लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा विभागाने तातडीने दखल घेऊन वडाळागावात शुद्ध स्वरुपाचा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.जलवाहिन्यांना अंतर्गत गळतीचा संशयवडाळागाव परिसरातील जलवाहिन्या जुनाट झाल्या असून, या जलवाहिन्यांपैकी काही जलवाहिन्यांना अंतर्गत गळती लागली असल्याची शक्यता नाकारता येणारी नाही. त्यामुळे जलवाहिन्या ‘वॉश आउट’ करून तपासणी करण्याची गरज आहे. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी शुद्ध करण्याबाबतची यंत्रणाही तपासण्याची आवश्यकता आहे.बोधलेनगरलाही समस्याअशोकामार्ग, बोधलेनगर, कल्पतरूनगर, फातेमानगर, खोडेनगर, अंजुम पार्क, हॅप्पीहोम कॉलनी, गणेशबाबानगर या भागांमध्येही मागील तीन ते चार दिवसांपासून मातीमिश्रित गढूळ स्वरूपाचा पाणीपुरवठा येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. प्रभाग क्रमांक २९ व ३०मध्ये पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या असून या भागातील नागरिकांनी शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater pollutionजल प्रदूषण