शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात आता टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:56 IST

गंगापूर, दारणा आणि आता मुकणे अशा तीन धरणांतून पाच हजार दशलक्षघनफूट असलेल्या नाशिक शहराला आता टॅँकरची गरज भासू लागली असून अनेक प्रभागांत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

नाशिक : गंगापूर, दारणा आणि आता मुकणे अशा तीन धरणांतून पाच हजार दशलक्षघनफूट असलेल्या नाशिक शहराला आता टॅँकरची गरज भासू लागली असून अनेक प्रभागांत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातच आता आगामी वर्षासाठी महापालिकेने सर्वच प्रभागात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा मागविल्या असल्याने नाशिकच्या पाणीपुरवठ्याला नक्की झालय काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.सुमारे तीस लाख रुपयांच्या या निविदांमध्ये पाणी मात्र नाशिक महापालिकेला द्यावे लागणार असून, प्रति फेरी सुमारे सहाशे रुपये मनपा देणार आहे. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे महापालिकेला किमान चारशे फेऱ्या सशुल्क कराव्या लागत असून, त्या पार्श्वभूमीवर आता टॅँकरची गरज भासू लागली आहे.दरम्यान, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी मात्र केवळ पाणीपुरवठा  विस्कळीत झाला तर त्याची आगाऊ तरतूद म्हणून टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे दर मागवून ठेवले असून, गरज भासल्यासच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगितले.पाणीपुरवठ्याच्या बाबतीत नाशिक हे सर्वांत सुखी शहर मानले जाते. गंगापूर धरण समूहातून महापालिकेला पाणी आरक्षण मिळते. परंतु त्याच बरोबर मुकणे धरणातून तीनशे दशलक्षघनफूट इतके आरक्षण मिळते. महापालिकेच्या पाणी वापराविषयी जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत दरवेळी चर्चा होत असते आणि काटकसरीचा सल्ला दिला जात असतो. तरीही महापालिकेने २००८ मध्येच किकवी धरणातून पाणी मिळवण्याची जलसंपदा विभागाकडून हमी घेऊन भविष्यकालीन पाण्याची तरतूद करण्यात आली होती.सिंचन घोटाळ्यामुळे किकवीचा विषय मागे पडल्याने महापालिकेने मुकणे धरणातून तीनशे दशलक्षघनफूट आरक्षण मिळवले आहे. आता शहरासाठी मुबलक पाणी असल्यानेभविष्यात टंचाई नसल्याचे सांगितले जात असले तरी दिवसाआड पाणीपुरवठा विस्कळीत होत असून, सध्या उपनगर आणि इंदिरानगर परिसरात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु त्यापलीकडे जाऊन आता आगामी वर्षासाठी महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी निविदा मागविल्या आहेत.दिवसाला दोन फेºया..पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेला पावसाळा वगळता आणि हिवाळा आणि उन्हाळ्यातील सुमारे दोनशे दिवसांसाठी या निविदा काढाव्या लागात. त्यातच प्रशासनानेच दिलेल्या माहितीनुसार सरासरी चारशे टॅँकरद्वारे फेºया होत असल्याने दिवसाकाठी दोन फेºया होतात असे स्पष्ट होते. दिवसाला दोन टॅँकर लागत असेल तर पालिकेकडे मुबलक पाणी असूनही पाणीपुरवठा कसा होतो हे स्पष्ट होते.महापालिकेने टॅँकरसाठी निविदा मागविताना प्रत्येक विभागातील प्रभागाचा उल्लेख केल्याने महापालिका प्रत्येक प्रभागात टॅँकरने पाणीपुरवठा करणार आहे? असा प्रश्न पडला आहे. तथापि, प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या वतीने दरवर्षीच अशाप्रकारे टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी दर मागविले जातात आणि पाणीपुरवठा कोठे विस्कळीत झाला की, त्याचा वापर केला जातो. नियमितपणे कुठेही टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ही निविदा नसल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुखांनी केला आहे.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणwater shortageपाणीटंचाईNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका