शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींनी गाठला तळ

By admin | Updated: March 5, 2016 22:03 IST

पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींनी गाठला तळ

 कळवण : महिलांची भटकंती, नदीपात्र कोरडेठाक, पिण्याच्या पाण्याची टंचाई आदिवासी बांधवांनी धरणे व्हावे, पाण्याची साठवण व्हावी, यासाठी शासनाला जमिनी दिल्या. त्याच आदिवासी बांधव व जनतेच्या घश्याला कोरड पडली तरी धरण उशाला राहून पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. या पाण्यावर तालुक्यातील जनतेपेक्षा अन्य तालुक्यातील जनतेचा अधिकार शासनाने लादल्याने पाणी असूनदेखील पाणी मिळविण्यासाठी शासन यंत्रणेच्या कार्यालयांचे उंबरठे झिजविण्याची वेळ आदिवासी जनतेवर आली आहे. अर्जुनसागर (पुनंद ) प्रकल्पातून सुळे डाव्या कालव्याद्वारे जानेवारी २०१६ मध्ये सोडलेले पाणी जुलै २०१६ पर्यंत पुरवण्याचे आव्हान ग्रामपंचायतीसमोर असून, तसा ठराव करून दिला आहे. मात्र नदीपात्र कोरडेठाक असल्याने पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींनी तळ गाठल्याने अर्जुनसागर ( पुनंद ) प्रकल्पक्षेत्रातील सुपले, काठरे, सुळे , जयदर, खडकी या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र झाला आहे . आदिवासी बांधवांनी उन्हाळ्यात पाण्यासाठी जायचे तरी कुठे, असा प्रश्न आहे. पाणी टंचाईची झळ कळवण तालुक्यात कमी बसत असली तरी या तालुक्यात काही भागात मात्र दुष्काळाचा शाप कायमस्वरूपी आहे. तो भोगावाच लागतो म्हणून आज तहान भागली म्हणून स्वस्थ बसलो तर उद्या मात्र पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागेल, अशी स्थिती आहे. त्यासाठी पाण्याचे नियोजन करणे क्र मप्राप्त ठरणार आहे.मनोज देवरे ल्ल कळवणअंग भाजून काढणारे ऊन आणि पाण्याची टंचाई अशा स्थितीत तालुक्याच्या आदिवासी भागातील जनता सापडते. मात्र कळवण शहरात राहणाऱ्या नागरिकांना पाणीटंचाईची भीषणता जाणवत नाही. उन्हाळ्यातदेखील शहरात कोट्यवधी रुपयांची घरांची बांधकामे चालू असून, दिवसातून चार-चार वेळा कॉँक्रीट कामावर अन् अंगणात पाणी मारण्याचे काम चालू आहे. आदिवासी भागात पाणीटंचाई तर शहरी भागात पाण्याचा अपव्यय अशी तालुक्याची स्थिती आहे. चणकापूर, अर्जुनसागर ( पुनंद ) या दोन मोठ्या प्रकल्पाबरोबर भेगू, धनोली, जामले, नांदुरी, ओतूर, गोबापूर, मार्कंडपिंप्री, धार्डे दिगर, मळगाव, बोरदैवत, भांडणे, खिराड या मध्यम प्रकल्पांबरोबर पुनंद व चणकापूर प्रकल्प अंतर्गत सात कालवे, पोटचाऱ्या, शेकडो पाझर तलाव, कोल्हापूर टाईप बंधारे, सीमेंट बंधारे यांच्यासह सिंचन योजना शहराला वरदान ठरल्याने पाणी टंचाईची दाहकता जाणवत नाही; मात्र अर्जुन सागर ( पुनंद ) प्रकल्प परिसरातील बंधारपाडा, उंबरगव्हाण, शिरसापाडा, उंबऱ्यामाळ, जांभाळ, महाल, उंबरदे, चोळीचा माळ, औत्यापाणी, धुमंदर, खळीचापाडा, गढीचापाडा, मोऱ्याहुड या भागात उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात पाणी ंचाई जाणवेल, असे ग्रामस्थांचे मत आहे. आज पाणी टंचाई जाणवत नसली तरी योग्य नियोजन न केल्यास भविष्यात पाणी टंचाई गंभीर होऊ शकते. कळवण तालुक्यातील चणकापूर आणि अर्जुनसागर ( पुनंद ) प्रकल्पातून मालेगाव महानगरासह मालेगाव तालुक्याला व सटाणा शहराला पाणी दिले जाते आहे. धरणे कळवण तालुक्यात आणि पाण्याचा अधिकार मालेगावकरांचा अशी शासनव्यवस्था असल्याने पाणी असूनदेखील भविष्यात पिण्याला पाणी मिळणार नाही, अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. तालुक्यात धरणे, लघु पाटबंधारे प्रकल्प, पाझर तलाव, गावतळे, वन तळे, सीमेंट बंधारे, सरकारी आणि खासगी विहिरी आहेत. तालुक्यातील जमीन भुसभुशीत असल्याने पाण्याचा झिरपा जलदगतीने होतो. परिणामी बंधारे, धरणे, तलाव, तळे व तलावांच्या पाण्याचा व पावसाचे पाणी जमिनीत मुरून विहिरीत उतरत असल्याने पाणी टंचाई कमी होण्यास मदत होते. कळवण तालुक्यात गावामध्ये आणि वाडी वस्त्यांवर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस पाणी टंचाई जाणवणार असल्याने प्रशासकीय यंत्रणेने त्या दृष्टीने आरखडा तयार केला असून, या टंचाईचा मुकाबला करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तहसीलदार अनिल पुरे आणि तहसीलदार तुकाराम सोनवणे यांनी दिली.उन्हाळ्यात आदिवासी बांधवांनी पाण्यासाठी जायचे तरी कुठे असा प्रश्न विचारत आहेत. कळवण तालुक्यातील अर्जुनसागर (पुनंद ) प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सुपले, शेरी, भैताने, सावरपाडा, चिंचपाडा, पिंपळे, दह्याने, गणोरे, सुळे, लखानी, जयदर, खडकी, प्रतापनगर या धरणाच्या काठाशी असलेल्या गावांमध्ये सध्या पाणी टंचाई जाणवू लागल्याने धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी परिस्थिती आदिवासी बांधवांची झाली आहे. अर्जुनसागर (पुनंद ) प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी जानेवारी २०१६ मध्ये मंजूर करताना जुलै २०१६ पर्यंत पाणी पुरवावे आणि उन्हाळ्यात पाण्याची मागणी करणार नाही, असे ठराव ग्रामपंचायतींकडून करून घेतल्याने मार्च महिन्यातच या गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष असणार असल्याने मग आदिवासी बांधवांनी पाण्यासाठी जायचे तरी कुठे ? असा सवाल आदिवासी बांधवांनी केला आहे. प्रकल्पात या भागातील आदिवासी बांधव व त्यांचे नातेवाईक, सगेसोयरे यांच्या जमिनी संपादित करून शासनाने प्रकल्प व त्याअंतर्गत कालवे बांधले. ज्या आदिवासी बांधवांच्या जमिनी गेल्या त्यांनाच आज पाण्यासाठी शासन व यंत्रणेच्या विनवण्या कराव्या लागत असून या प्रकल्पाचे पाणी मिळविण्यासाठी आदिवासी बांधवांना अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची परिस्थिती कळवण या पाण्याच्या सुजलाम् सुफलाम् आगारात निर्माण झाल्याची शोकांतिका आहे. यापूर्वी पाण्याची टंचाई निर्माण झाल्यावर प्रकल्पातून पाणी मिळत होते. आता मात्र परिस्थितीत बदल्याने पाणी टंचाईचा मुकाबला आदिवासी बांधवाना करावा लागत असल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले. धरण उशाशी असून सुद्धा कोरड पडलेल्या घश्याला पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र आदिवासी भागात दिसून येत आहे. अर्जुनसागर ( पुनंद ) प्रकल्पातील पाण्यावर कळवण तालुक्यातील लाभक्षेत्रातील जनतेचा प्रथम अधिकार असून, जनतेला शासन व यंत्रणेने प्रथम पाणी उपलब्ध करून द्यावे नंतर पाण्यावर इतरांचा अधिकार ठेवून आरक्षण करावे, अशी मागणी कळवण तालुक्यातील जनतेने केली आहे .