शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पिकांसाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:11 IST

पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, चांदवड व सिन्नर तालुक्यातील ३३ टक्के पाणी उपलब्ध असलेल्या लघु तलावांमधून खरीप हंगामी पिकांना सिंचनासाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन असून, त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

नाशिक : पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, चांदवड व सिन्नर तालुक्यातील ३३ टक्के पाणी उपलब्ध असलेल्या लघु तलावांमधून खरीप हंगामी पिकांना सिंचनासाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन असून, त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  प्रवाही, उपसा किंवा ठिबक पद्धतीने खरीप हंगामात विहीर पाण्याची सोय असलेल्या बारमाही उभ्या पिकांना मर्यादित क्षेत्रास शेती सिंचनासाठी लाभ घ्यावयाचा असल्यास लाभार्थ्यांनी आपले पाणी अर्ज मंगळवारी (दि.२८) सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत संबंधित शाखा कार्यालयात दाखल करण्याचे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.  धरणांत उपलब्ध होणाऱ्या नवीन पाणी साठ्याबाबत शासन व वरिष्ठ कार्यालयाच्या निर्णयाप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा करताना पाऊस कमी झाल्यास धरणातील पाणी साठा कमी झाल्यास अथवा नैसर्गिक आपत्ती म्हणून पिण्याचे पाणी राखून ठेवण्याची आवश्यकता भासली तर अशा वेळी दिलेला परवाना रद्द करण्यात येणार आहे. त्यासाठी नुकसानभरपाई अथवा न्यायालयात दावा दाखल करता येणार नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, चांदवड व सिन्नर तालुक्यातील लघु प्रकल्पांमधून उपलब्ध होणाºया पाण्यात तेलबिया व चारा पिकास प्राधान्य देण्यात येणार असून ही मंजुरी पाण्याची उपलब्धता विचारात घेऊनच देण्यात येणार आहे.अवैध उपसा करणा-यांवर कारवाईचा इशाराकालवा, जलाशय व नदी यावरील मंजूर उपसाधारकांव्यतिरिक्त इतर कुणीही इलेक्ट्रिक मोटारी अथवा आॅइल इंजिन ठेवून अथवा पाइपलाइनद्वारे व डोंगळा पाइपद्वारे पाणी घेण्याचा प्रयत्न करू नये. असे केल्याचे स्थानिक अधिकारी यांचे निदर्शनास येताच सिंचन अधिनियम संबंधिताची इलेक्ट्रिक मोटार, आॅइल इंजिन व तत्संबंधित साहित्यावर जप्ती करण्यासह पोलीस फिर्याद दाखल करण्याचा इशारा देतानाच कुणीही विना परवानगी पाणी वापर करू नये, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाने केले आहे.उच्च न्यायालयात जायकवाडी धरणासाठी पाणी सोडणेबाबत जनहित याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे न्यायालयीन निर्णयानुसार अथवा शासन निर्णयानुसार आवर्तन देणेबाबत कार्यवाही होणार आहे. तसेच सिंचन पुरवठ्यासाठी केवळ खरिपाचे मागणी क्षेत्र मागविण्यात येत आहे. आवर्तन कालावधी अथवा कालव्यातून पाणी सोडणेबाबत शासन अथवा वरिष्ठ कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर कालवा सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Waterपाणीagricultureशेती