शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षांपासून महापालिकेला कराराविनाच पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:12 IST

गंगापूर आणि अन्य धरणांतून नाशिक महापालिकेला पाणीपुरवठा नियमितपणे सुरू असला तरी गेल्या आठ वर्षांपासून त्यासाठी जलसंपदा विभागाशी कोणत्याही प्रकारचा करारच करण्यात आलेला नाही.

नाशिक : गंगापूर आणि अन्य धरणांतून नाशिक महापालिकेला पाणीपुरवठा नियमितपणे सुरू असला तरी गेल्या आठ वर्षांपासून त्यासाठी जलसंपदा विभागाशी कोणत्याही प्रकारचा करारच करण्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी लवकरच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलाविण्याचे आदेश दिले आहेत.  महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर राधाकृष्ण गमे यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. त्या दरम्यान, याबाबत चर्चा झाली आहे. नाशिक महापालिकेला गंगापूर धरणातून वर्षानुवर्षे पुरवठा होतो, त्याचबरोबर दारणा धरणातूनदेखील जलसंपदा विभाग पाणी उपलब्ध करून देते. महापालिकेने केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानात सहभागी झाल्यानंतर वाढीव पाणीपुरवठा करण्याच्या योजना आखल्या होत्या. त्यासाठी जलसंपदा विभागाकडून पाणीपुरवठ्याची हमी आणि मंजुरी हवी असल्याने २००८ मध्ये उच्चस्तरीय समितीची बैठक झाली होती. त्यावेळी शहरातील भविष्यकालीन योजनांसाठी नवा प्रकल्प म्हणून किकवी धरणास मान्यता देण्यात आली. सदरचे धरण आधी महापालिकेच्या वतीने बांधण्यात येणार होते, परंतु नंतर शासनाने बांधण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, अशाप्रकारचे धरण बांधण्याच्या निमित्ताने जलसंपदा विभागाने बाधित सिंचन क्षेत्राची भरपाई म्हणून महापालिकेकडे तगादा लावला. सुमारे पावणे दोनशे कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. ती आता कमी झाली असली तरी वाढीव मागणीची देयके देताना आधी रक्कम भरा, मगच वार्षिक पाणी वितरणाचे करार करण्यात येईल, अशी भूमिका जलसंपदा विभागाने घेतल्याने गेल्या २०११ पासून महापालिकेकडे वार्षिक पाणी वितरणाचा अद्याप करारच करण्यात आलेला नाही. अर्थात, जलसंपदा विभागाने महपालिकेचे पाणी रोखले नाही की, महापालिकेने अद्याप कोणत्याही प्रकारचे देयक प्रलंबित ठेवलेले नाही.आयुक्त गमे यांनी पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेताना हा प्रकार उघड झाल्याने त्यांनी हा विषय प्रलंबित न ठेवता तो निकाली काढण्याची भूमिका घेतली असून, जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांबरोबरच बैठक बोलाविण्यास सांगितले आहे.किकवीबरोबर कश्यपीचा प्रश्नही जटिलकिकवी धरण न बांधताच महापालिकेचे बाधित सिंचन क्षेत्राचा खर्च मागण्यात आला होता. आता तर या धरणाच्या निविदाही रद्द आहेत. परंतु त्याचबरोबर १९९२ पासून कश्यपी धरणाचादेखील प्रश्न प्रलंबित आहे. महापालिकेने या धरणात आर्थिक सहभाग देण्यासाठी पाच कोटी रुपये दिल्यानंतर धरणाची किंमत वाढल्याने वाद निर्माण झाला होता.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी