शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

४९३ ठिकाणी साचणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 01:32 IST

नाशिक : महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळी गटार योजना राबविली असली तरी प्रत्यक्षात मात्र शेकडो ठिकाणी तळे साचल्याने पालिकेचे पितळ उघडे पडते. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरातील विविध विभागात तब्बल ४९३ ठिकाणी पाणी साचणार असून, संभाव्य संकट टाळण्यासाठी नालेसफाईसह अन्य उपाययोजना युद्धपातळीवर सुरू केल्या आहेत.

ठळक मुद्देपाणी साचणारी महत्त्वाची ठिकाणे पालिकेची यादी : नालेसफाईसह अन्य कामांना वेग

नाशिक : महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळी गटार योजना राबविली असली तरी प्रत्यक्षात मात्र शेकडो ठिकाणी तळे साचल्याने पालिकेचे पितळ उघडे पडते. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरातील विविध विभागात तब्बल ४९३ ठिकाणी पाणी साचणार असून, संभाव्य संकट टाळण्यासाठी नालेसफाईसह अन्य उपाययोजना युद्धपातळीवर सुरू केल्या आहेत.दरवर्षी पावसाळ्यात अनेक सखल भागात पाणी साचते आणि त्यामुळे संपूर्ण शहरात वाहतूक ठप्प होत असते. गेल्यावर्षी जून महिन्यात सायंकाळी तासाभरात जोरदार झालेल्या पावसामुळे अशीच नाशिककरांची दैना उडाली होती आणि पालिकेच्या नियोजनाच्या चिंधड्या उडाल्या होत्या. सदरचे प्रकरण प्रशासनावर शेकणार असे लक्षात येताच महापालिकेने दोन तासांत ९२ मिलिमीटर अतिवृष्टी झाली, असा दावा केला होता. दरम्यान, यंदा अशाप्रकारची दैना टाळण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात तब्बल ४९३ पाणी साचणारी ठिकाणे असून, तेथे पाण्याचा निचरा व्हावा यासाठी नालेसफाईवर भर देण्यात आला आहे. मात्र शहरात नालेसफाईचे कामे होत नसल्याने पाणी तुंबण्याची शक्यता वाढली आहे.पश्चिम विभाग- सराफ बाजार, ओकाची तालीम, दहीपूल, सिद्धेश्वर मंदिर, शुक्लगल्ली कॉर्नर, न्यू मराठी शाळा डोंगरे मैदानाजवळ, चोपडा लॉन्स, जुना गंगापूर नाका, पंडित कॉलनी, राजीव गांधी भवनासमोर, नवरचना हायस्कूलसमोर, खतीब डेअरी, मंगलवाडी, विसे चौकाची दक्षिण बाजू, मारिया विहारचे प्रवेशद्वार, निर्मला कॉन्व्हेंट, होरायझन स्कूल, गीतांजली सोसायटी, कुसुमाग्रज स्मारक, शहीद चौक, रविशंकर अपार्टमेंट, महात्मानगर, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, एबीबी सर्कल, पी अ‍ॅन्ड टी कॉलनी, गोदावरी कॉलनी, विजन हॉस्पिटलमागे, आम्रपाली सोसायटी, डिसूझा कॉलनी, सहवासनगर, कुटेमार्ग, राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र, सिटी सेंटर मॉल, मुंबई नाका, संदीप हॉटेलजवळ, साठे चौक, खडकाळी. पूर्व विभाग- अमरधामरोड, कन्नमवार पूल, काठेगल्ली येथील त्रिकोणी गार्डन, बनकर चौक, रवींद्रनाथ विद्यालय चौक, टाकळीगाव, वैदूवाडीजवळ, इच्छामणी सोसायटी, रामदास स्वामीनगर, कन्हैया स्वीटजवळ, अशोकामार्ग, पखालरोड, वडाळारोड, डीजीपीनगर मारुती मंदिराजवळ, गायकवाड सभागृह, बापूबंगला.पंचवटी विभागदिंडोरी नाका, रूपश्री बिल्डिंग, पंचवटी पोलीस ठाण्यासमोर, चित्रकुट सोसायटी, लकडापूल, मखमलाबाद नाका, रामवाडी पूल, चिंचबन, बायजाबाईची छावणी, औदुंबरनगर, अमृतधाम, कोणार्कनगर.सातपूर विभागसातपूर कॉलनी, आंबेडकर भाजी मार्केट, कांबळेवाडी, कामगारनगर, संत कबीरनगर, आनंदवली, अशोकनगर, शिवाजीनगर, सीपी टूल झोपडपट्टी, संतोषी मातानगर, एमआयडीसी.सिडको विभागसिंहस्थनगर, खुटवडनगर, पवननगर, गणेश चौक, माउली लॉन्स, महाराणा प्रताप चौक, दत्त चौक, त्रिमूर्ती चौक, संभाजी चौक, आयटीआय पूल, गोविंदनगर, इंदिरानगर, अंबड पोलीस ठाणे, संभाजी सोसायटी.