शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

गंगापूर धरणाचा जलसाठा ३२ दलघफूने वाढला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 19:34 IST

गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात एकूण २९१ मिमीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद गुरूवारी सकाळी सहा वाजेपर्यंत झाली.

ठळक मुद्दे२४ तासांत धरणक्षेत्रात १२५ मिमी पाऊस

नाशिक : शहरासह जिल्ह्यात बुधवारी (दि.३) सकाळपासून ढगाळ हवामानासह पावसाची रिपरिप सुरूच होती; मात्र संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार वादळी पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. गंगापूर धरणक्षेत्रात गुरूवारी (दि.४) सकाळी सहा वाजेपर्यंत १२५ मिमी इतका पाऊस नोंदविला गेला. सकाळपर्यंत धरणसाठ्यात ३२ दलघफूने वाढ झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. सध्या धरण ४७.२२ टक्के भरलेले आहे.मुंबईकडून उत्तर महाराष्टÑाकडे निघालेल्या ‘निसर्ग’ चक्र ीवादळाचा प्रभाव बुधवारी (दि.३) शहरातही मोठ्या प्रमाणात जाणवला. बुधवारी सकाळपासून संध्याकाळी साडे ५ वाजेपर्यंत १७ मिमी पर्यंत पाऊस नोंदविला गेला. बुधवारी दुपारनंतर सरींची रिपरिप मुसळधार पावसात बदलली. त्यावेळी शहरात ताशी ३० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहत होते. संध्याकाळनंतर मुसळधार वादळी पावसाने शहराला झोडपून काढले. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत जोर‘धार’ वादळी पाऊस शहरात सर्वत्र सुरू होता. रात्री साडेआठ ते साडे दहा वाजेपर्यंत ५२.३ तर साडेदहा ते साडे अकरा वाजेपर्यंत केवळ तासाभरात शहरात ६६.४ मिमी पावसाची नोंद झाली. या तीन तासांत ११८ मिमी इतका पाऊस शहरात झाला यासोबतच गंगापूर धरणक्षेत्रातसुध्दा पावसाचा वेग वाढल्याने जवळपास १०० मिमी इतका पाऊस रात्री आठ वाजेपासून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत पडला. वाऱ्याचा वेगदेखील ताशी ५० ते ६० किमी असा होता. गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात ३० दलघफूने वाढ होऊन साठा २ हजार ६९९ पर्यंत पोहचला. तसेच काश्यपी धरणाच्या क्षेत्रात ५७ मिमी इतका पाऊस पडला तर गौतमी गोदावरी धरणक्षेत्रात ३३ मिमी पाऊस झाला आणि अंबोली व त्र्यंबकेशवर परिसरात प्रत्येकी ३८ मिमी इतका पाऊस झाला. गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात एकूण २९१ मिमीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद गुरूवारी सकाळी सहा वाजेपर्यंत झाली.

 

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणNashikनाशिकCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळRainपाऊस