नाशिक - शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणसमुहात ८३ टक्के इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी महापालिकेला जुलै २०१८ पर्यंत आरक्षित पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. महापालिकेकडून सद्यस्थितीत गंगापूर धरणातून प्रतिदिन १५.२० दलघफू पाण्याचा उपसा केला जात असून ३१ जुलै पर्यंत ३००० दलघफू पाणी आरक्षण शिल्लक असल्याने यापुढे पाणी उपशाबाबत नियोजन महत्वाचे ठरणार आहे.महापालिकेला १५ आॅक्टोबर २०१७ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीसाठी गंगापूर धरणातील ३९०० तर दारणा धरणातील ४०० दलघफू पाणी आरक्षित केले आहे. प्रतिदिन १४.८२ दलघफू पाणी उपशाप्रमाणे एकूण ४३०० दलघफू पाणी आरक्षित करण्यात आलेले आहे. महापालिकेने दि. १५ आॅक्टोबर २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत गंगापूर धरणातून १२१०.४५ दलघफू तर दारणा धरणातून ८१.२२ दलघफू पाण्याची उचल केलेली आहे. दोन्हीमिळून १२९१.६७ दलघफू पाण्याचा उपसा झालेला आहे. महापालिकेने आतापर्यंत प्रतिदिन १५.२० दलघफू पाण्याची उचल करत शहराला प्रतिदिन ४३० दसलक्षलिटर्स पाणी पुरवठा केला जात आहे. सद्यस्थितीत गंगापूर धरणातील २६८९.५५ दलघफू तर दारणातील ३१८.७८ दलघफू पाणी आरक्षण शिल्लक आहे. गंगापूर धरणात आजमितीला ४५८० दलघफू म्हणजे ८१.३५ टक्के तर दारणा धरणात ५९२१ दलघफू म्हणजे ८२.८२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर गंगापूर धरण समुहातील कश्यपी धरणात ९६.८७ टक्के, गौतमी धरणात ७४.२४ टक्के पाणीसाठा आहे. गंगापूर धरण समुहात मुबलक पाणीसाठा शिल्लक असला तरी महापालिकेला येत्या सात महिन्यांसाठी उपलब्ध पाणीसाठा पाहता काठोकाठ वापर करावा लागणार असून पाणीबचतीचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्यानुसार, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.उन्हाळ्यात वाढणार पाणीवापरसद्यस्थितीत हिवाळ्यामुळे पाण्याची मागणी कमी आहे. तरीही महापालिकेकडून गंगापूर धरणातून १५.२० दलघफू पाण्याची उचल होत आहे. आता फेबु्रवारीपासून उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढणार असून महापालिकेला त्यादृष्टीने नियोजन करणे भाग पडणार असून नागरिकांचेही प्रबोधन करावे लागणार आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा; तरीही पाणीबचतीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 21:06 IST
महापालिका : प्रतिदिन १५ दलघफू पाणी उपसा
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा; तरीही पाणीबचतीचे आव्हान
ठळक मुद्देमहापालिकेकडून सद्यस्थितीत गंगापूर धरणातून प्रतिदिन १५.२० दलघफू पाण्याचा उपसा३१ जुलै पर्यंत ३००० दलघफू पाणी आरक्षण शिल्लक असल्याने यापुढे पाणी उपशाबाबत नियोजन महत्वाचे ठरणार