शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

येवला तालुक्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 17:27 IST

येवला : तालुक्यात पाणी टंचाईची तीव्र झळ बसू लागली असून मार्च महिन्याअखेर पाणी टंचाईची व्याप्ती वाढणार असल्याचे संकेत स्पष्ट दिसत आहे.

येवला : तालुक्यात पाणी टंचाईची तीव्र झळ बसू लागली असून मार्च महिन्याअखेर पाणी टंचाईची व्याप्ती वाढणार असल्याचे संकेत स्पष्ट दिसत आहे.पूर्व भागातील स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा करणाºया विहिरीचे श्रोत आटले असून पाणीटंचाईची तीव्रता वाढायला लागली आहे. तालुक्यातील बाळापुर, कुसुमाडी, चांदगाव, खैरगव्हाण, आहेरवाडी, कासारखेडे, पिंपळखुटे तिसरे, गोपाळवाडी या आठ गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकाºयांनी मंजूर केले असून, चार टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.यापैकी दोन शासकीय टँकर येवल्यात पोहचले असून पाच गावे व एका वाडीला प्रत्येकी एक खेप शुक्र वारी सुरु झाली आहे.आगामी दोन दिवसात दोन शासकीय पाणीपुरवठा टँकर उपलब्ध होण्याची माहिती आहे.येवला पंचायत समतिीने पाठवलेले कोळगाव,वाईबोथी, गुजरखेडे,ममदापूर या चार गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.याची मंजुरी येताच पाणीपुरवठा सुरु केला जाणार आहे.-------------------खिर्डीसाठे,अनकाई, वसंतनगर,गोरखनगर,सायगाव (महादेववाडी ) अशी चार गावे व एक वाडी यांचे पाणी टँकरच्या मागणीचा प्रस्ताव येवला पंचायत समतिीकडे आला आहे.पाणीटंचाई संदर्भाने स्थळ तहसील व पंचायत समतिी स्तरावरील स्थळ पाहणी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.---------------पूर्व भागात रेंडाळे,कोळम खुर्द,कोळमबुद्रुक,डोंगरगाव,आडसुरेगाव,भुलेगाव,पांजरवाडी,धामणगाव,खामगाव,देवठाण,तळवाडे,गणेशपूर,लहीत,हडपसावरगाव,नगरसूलच्या वाडीवस्ती,पन्हाळसाठे,या गावांना देखील सध्या पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणावर बसू लागली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक