शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
2
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
3
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
4
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
5
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
6
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
7
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
8
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
9
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
10
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
11
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
12
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
13
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
14
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
15
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
16
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
17
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
18
Lucky Sign: 'ही' चिन्ह दिसू लागली की समजून जा, वाईट काळ संपून 'अच्छे दिन' येणार!
19
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
20
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

लोकसहभागातून राबवणार जलशक्ती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 1:31 AM

महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शहरात लोकसहभागातून जलशक्ती अभियान प्रभावीरीत्या राबविण्यात येणार असून, त्यात पाणीबचत, वृक्षारोपण व रेनवॉटर हार्व्हेस्टिंग यांसारख्या विविध विषयांची अंमलबजावणी करून त्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

नाशिक : महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शहरात लोकसहभागातून जलशक्ती अभियान प्रभावीरीत्या राबविण्यात येणार असून, त्यात पाणीबचत, वृक्षारोपण व रेनवॉटर हार्व्हेस्टिंग यांसारख्या विविध विषयांची अंमलबजावणी करून त्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जुलै ते १५ सप्टेंबर या काळात पाच घटकांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यात पावसाळी पाण्याचे संवर्धन, प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर, नैसर्गिक जलाशय सरोवरांचे पुनरुत्थान, वृक्षारोपण व जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. पावसाळी पाण्याचे संवर्धनच्या माध्यमातून घराच्या छतावर व रस्त्यावर खुल्या जागेमध्ये पडणारे पावसाचे पाणी साठविणे व संवर्धन करून या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे.हा उपक्रम मनपाची कार्यालये तसेच सार्वजनिक इमारती, निवासी इमारती, गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. नगररचना विभागाकडून यापुढे बांधकाम परवानगी देताना रेनवॉटर हार्व्हेस्टिंग केले आहे किंवा नाही याची कटाक्षाने पाहणी केली जाईल. नैसर्गिक जलाशयाचे पुनरुत्थान करण्याच्या दृष्टीने शहरांमध्ये असणारे नैसर्गिक पाण्याचे जलाशय, तलाव, सरोवर, विहिरी बावडी जलस्रोतांचे पुनरुत्थान करण्यात येत आहे.या नैसर्गिक जलस्रोतांची साफसफाईदेखील केली जाणार आहे. वृक्षारोपणासाठी जागांची निवड करण्यात येऊन त्या जागेवर तसेच शाळांच्या आवारात वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पाणी बचतीसाठी शहरात जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांनी यात सक्रिय सहभागी होऊन मनपास सहकार्य करावे, तसेच जलसंधारणाचे अधिकाधिक उपक्रम राबवावे असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी