शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी भागात भर पावसात पाणीटंचाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:59 IST

गंगापूर धरणातील जलसाठा कमी झाल्याने प्रशासनाच्या वतीने दैनंदिन पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येऊन नाशिक शहरात दररोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

पंचवटी : गंगापूर धरणातील जलसाठा कमी झाल्याने प्रशासनाच्या वतीने दैनंदिन पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येऊन नाशिक शहरात दररोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पंचवटीतील प्रभाग क्रमांक ५ मध्ये असलेल्या शनिचौक, सरदारचौक, गोरेराम लेन, मुठे गल्ली भागात गेल्या चार दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला नाही त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.दरम्यान, परिसरात पाणीपुरवठा होत नसल्याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर सोमवारी सकाळी महापालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत परिसरात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. विशेष म्हणजे परिसरात पाणी येत नसल्याची तक्रार केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी पाणीकपात केल्याने कमी दाबाने पाणी येत आहे तसेच ज्या भागात पाणी येत नाही त्या ठिकाणी पाण्याला गळती लागली असून, लिकेज सापडत नसल्याचे सांगून वेळ मारून दिली. त्यामुळे नागरिकांना गेल्या तीन ते चार दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले. पंचवटीतील गावठाण परिसर म्हणून ओळखल्या जाणाºया भागात पहिल्यांदा चार दिवस पाणीपुरवठा न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे प्रभागातील या पाणीटंचाईबाबत संबंधित लोकप्रतिनिधीदेखील अनभिज्ञ असल्याचे प्रभागातील नागरिकांनी सांगितले.शिंगाडा तलाव परिसरात टंचाईशिंगाडा तलाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अत्यल्प पाणीपुरवठा होत असून, सोमवारी तर संपूर्ण दिवसभर अनेक भागांत पाणी नव्हते. महापालिकेने याबाबत कोणतीही सूचना दिली तर नव्हतीच. शिवाय पर्यायी व्यवस्थादेखील करण्यात आली नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.शहरात धो-धो पाऊस पडत असताना गेल्या दोन दिवसांपासून शनि चौक, सरदार चौक, सुकेणकर लेन, मुठे गल्ली या भागात एक थेंब पाण्याचादेखील पुरवठा झालेला नाही. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळाले नसल्याने गोदाकाठी वसलेल्या पंचवटी भागात प्रथमच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला आहे.- देवांग जानी, रहिवासी

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater shortageपाणीटंचाई