शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आरक्षणात महापालिकेवर ‘संक्रांत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:00 IST

पावसाने दिलेल्या ओढीमुळे जिल्ह्यातील पूर्व भागावर घोंगावू लागलेले दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट पाहता नाशिक महापालिकेने गंगापूर धरणातील पाण्याचा काटकसरीने वापर करावा,

नाशिक : पावसाने दिलेल्या ओढीमुळे जिल्ह्यातील पूर्व भागावर घोंगावू लागलेले दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट पाहता नाशिक महापालिकेने गंगापूर धरणातील पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असा सल्ला देतानाच जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी नाशिक महापालिकेची एकूण लोकसंख्या व त्यासाठी धरणातून आरक्षित ठेवण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणाची संबंधितांकडून आकडेवारी घेताना कोणताही मेळ बसत नसल्याचे पाहून महापालिकेची गरज पाहता आॅक्टोबरच्या पाणी आरक्षणात मोठी कपात करण्याचे संकेत दिले आहेत.  जिल्ह्यातील टंचाईसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी बोलविण्यात आलेल्या बैठकीत महापालिकेच्या पाणी वापराचा विषय निघाल्याने त्याचा संदर्भ कश्यपी धरणग्रस्तांच्या प्रश्नाशी जोडला जात असून, गेल्या आठवड्यातच महापालिकेने कश्यपी धरणग्रस्तांना सेवेत सामावून घेण्यास नकार दिल्याने त्याचवेळी जिल्हाधिकाºयांनी ‘आॅक्टोबरच्या पाणी आरक्षणाच्या वेळी पाहू’ अशी गर्भित धमकी महापालिकेच्या उपायुक्तांना दिली होती. या घटनेला काही दिवस जात नाही तोच राधाकृष्णन् यांनी मंगळवारच्या बैठकीत थेट मुद्द्यालाच हात घातला. महापालिकेची लोकसंख्या किती व दरडोई पाणी वापराचा विचार करता, गंगापूर धरणातून महापालिका दररोज किती पाणी उचल करते? असा प्रश्न पाटबंधारे व महापालिकेला विचारला. त्यावर बैठकीत चर्चा झाली.१३०० दशलक्ष घनफूट अतिरिक्तपाणी  वर्षाचा म्हणजेच आॅक्टोबर ते जुलै यादरम्यान महापालिकेला २७०० दशलक्ष घनफूट पाण्याची गरज असताना महापालिका दरवर्षी ४३०० दशलक्ष घनफूट पाणी उचल करीत असल्याची बाब यानिमित्ताने चर्चिली गेली. त्यावर जिल्हाधिकाºयांनी पाण्याची गळती किती व वहन नुकसानीचा विचार करून आणखी ३०० दशलक्ष घनफूट पाणी अतिरिक्त देण्याची तयारी दर्शविली, तरीही महापालिकेला १३०० दशलक्ष घनफूट अतिरिक्तपाणी दिले जात असल्याचे लक्षात आल्यावर आॅक्टोबरच्या पाणी आरक्षणात महापालिकेने वस्तुस्थितीदर्शक मागणी नोंदविण्याच्या सूचना केल्या आहेत. गंगापूर धरणातील पाणी जपून वापरल्यास त्याचा उपयोग नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर, मनमाड आदी अन्य टंचाईग्रस्त तालुक्यांना करता येईल असा त्या मागचा हेतू असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी