शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

पाणीकपातीसाठी पालिकेवर दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 01:19 IST

महापालिकेने थेंब थेंब पाणी वाचवून आणि नवीन पाणीपुरवठा योजना राबवून शहरासाठी टंचाईतही मुबलक पाणी राहील अशी व्यवस्था केली असताना दुसरीकडे मात्र जलसंपदा विभाग जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पाणीकपात करण्यासाठी दबाव आणत आहे.

नाशिक : महापालिकेने थेंब थेंब पाणी वाचवून आणि नवीन पाणीपुरवठा योजना राबवून शहरासाठी टंचाईतही मुबलक पाणी राहील अशी व्यवस्था केली असताना दुसरीकडे मात्र जलसंपदा विभाग जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पाणीकपात करण्यासाठी दबाव आणत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेला पत्र पाठवून कपातीबाबत अभिप्राय मागविला आहे. त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर आणि मराठवाड्यासाठी आवर्तन सोडण्याचे घाटत असल्याची चर्चा आहे.महापालिकेला गतवर्षी शंभर दशलक्ष घनफूट ज्यादा पाणी आरक्षण दारणा धरणातून देण्यात आले आहे. मुळात दारणा धरणातून इतके पाणी उपसण्याची क्षमता महापालिककडे नाही. तथापि, मुकणे धरणाचे सुरू असलेले काम नुकतेच पूर्ण झाल्याने नाशिककरांवर कपात करण्याची वेळ आलेली नाही. मात्र, शहरात पाणीटंचाई नसल्याचे निमित्त करून यातील काही पाणी कमी करता येईल काय यासाठी जलसंपदा विभाग पाठपुरावा करीत आहे.जलसंपदा विभागाने यासंदर्भात १४ मे राजी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. त्यात म्हटल्यानुसार महापलिकेला गंगापूरसमूह, दारणा आणि मुकणे धरणातून पाणी आरक्षण देण्यात आले आहे. त्यातील ३१६८ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर (दि.१४ मेपर्यंत) झाला असून, उर्वरित १०३२ दशलक्ष घनफूट आरक्षणसाठा गंगापूर जलाशयात शिल्लक आहे. महापालिकेच्या वतीने सध्या गंगापूर धरणातून १५ ते १६ दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा शहरात केला जात असून, हा पाणी वापर २०१५-१६ या वर्षाच्या तुलनेत १२ दशलक्ष घनफूट प्रतिदिन जास्त आहे. त्यामुळे महापालिकेने जलाशयातून पाणी साठ्याचा काटकसरीने पाणी वापर केल्यास जुलै महिन्यापर्यंत पाणीटंचाई भासणार नाही, असे नमूद केले आहे. त्या अनुषंघानेच पालक सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नाशिक महापालिकेच्या पाणी वापराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावेळी महापालिका आणि जलसंपदा विभागाने एकत्रित बसून याबाबत निर्णय घ्यावा, असे सांगून सीतराम कुंटे यांनी हा विषय बाजूला ठेवला आहे.पाणी किती दिवस पुरणार ८० की ६० ?मध्यंतर महापालिकेकडून पाणी आरक्षण, वापर आणि शिल्लक पाण्याचा एक तक्ता उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणातून आणखी ८० दिवस पाणीपुरवठा होईल, असे नमूद करण्यात आले होते. तथापि, जलसंपदा विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार जुलैपर्यंतदेखील पाणीपुरवठा होणार नाही असे नमूद केल्याने गोेंधळ वाढला आहे.आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आडून जलसंपदा विभाग महापालिकेवर पाणीकपातीसाठी दबाव आणत आहे. त्याअंतर्गतच जिल्हा प्रशासनाने महापालिकेला पत्र धाडले असून, महापालिकेचे आरक्षण किती आहे तसेच पाणीकपातीविषयी अभिप्राय काय, असे महापालिकेला मत विचारले असून, त्या आधारे प्रशासनावर दबाव आणला जात असल्याची चर्चा होत आहे.४राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या एका निर्णयानुसार आता धरणातून पाणी आरक्षण करण्याचे सर्वाधिकार जलसंपदाकडे असणार आहे. आजपर्यंत जिल्हा प्रशासन आणि अन्य संबंधित यंत्रणांची बैठक पालकमंत्री घेत असतात आणि त्यात पाणी आरक्षण त्यात ठरत असते. परंतु आता सर्वाधिकार जलसंपदाकडे गेल्याने महापालिकेच्या अडचणी वाढणार आहेत.

टॅग्स :WaterपाणीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका