शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

राष्टय भोई समाज युवा मंचचे जलआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:37 AM

राष्टय भोई समाज क्रांती दल महापरिवार, युवा मंच, महिला मंच, कर्मचारी परिषद तसेच मच्छीमार संघाच्या वतीने राष्टÑीय समाज युवा मंच राष्टÑीय अध्यक्ष नरेश उखंडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ११) सकाळी भोई समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा तसेच अन्य विविध मागण्यांसाठी गोदावरी नदीत पाण्यात उभे राहून तासभर जलआंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भोई समाज पुरुष, महिला तसेच युवक व युवती सहभागी झाले होते.

पंचवटी : राष्टय भोई समाज क्रांती दल महापरिवार, युवा मंच, महिला मंच, कर्मचारी परिषद तसेच मच्छीमार संघाच्या वतीने राष्टÑीय समाज युवा मंच राष्टÑीय अध्यक्ष नरेश उखंडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ११) सकाळी भोई समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा तसेच अन्य विविध मागण्यांसाठी गोदावरी नदीत पाण्यात उभे राहून तासभर जलआंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भोई समाज पुरुष, महिला तसेच युवक व युवती सहभागी झाले होते.  सोमवारी सकाळी १० वाजता जुने नाशिक अमरधामरोडवरील श्री शितळादेवी मंदिर येथून पायी मोर्चाने या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा गंगाघाटावरील खंडोबा महाराज मंदिरापर्यंत नेण्यात येऊन नंतर भोई समाजाच्या बांधवांनी गोदावरी नदीत पाण्यात उतरून हमारी मांगे पुरी करो नही तो खुर्ची खाली करो, भोई समाजाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या.  भोई समाजाच्या समस्या मांडणारा एकही आमदार तसेच खासदार नाही. त्यामुळेच समाजाच्या विविध अडचणी वाढत आहेत त्याची शासनाने दखल घ्यावी यासाठी हे जलआंदोलन करण्यात आले. राज्यभरात सुमारे ६० लाख भोई समाजबांधव असून, त्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे.  या आंदोलनात प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर खैरमोडे, प्रदेश सरचिटणीस तुषार सोटोटे, उत्तर महाराष्टÑ अध्यक्ष नीलेश शिवदे, जिल्हाध्यक्ष नीलेश वाडिले, युवा मंचचे महासचिव राजेश मोरे, कार्याध्यक्ष उत्तम घटमाळे, शहरअध्यक्ष सागर ठाकरे, महिला मंच उत्तर महाराष्टÑ अध्यक्ष सुजाता फुलपगारे, जिल्हाध्यक्ष धनश्री ढोले आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने या जलआंदोलनात सहभागी झाले होते.शासनदरबारी समस्या मांडणारभोई समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, गोड्या पाण्यातील मासेमारी करण्यासाठी परवानगी देऊन ठेकेदारी पद्धत रद्द करावी व महानगरपालिका क्षेत्रातील व इतर विभागांत वर्षानुवर्षे चने फुटाणे व मच्छीमार व्यवसाय करणारे अधिकृत करण्यात यावेत यासाठी हे आंदोलन करण्यात आले. भोई समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचाव्यात यासाठी आमदार सीमा हिरे यांनी आंदोनलकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्या शासनदरबारी मांडणार असल्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Nashikनाशिक